मुंबई -कोकण कट्टा विलेपार्ले व देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ विलेपार्ले यांच्या संयुक्त पणे शालेय गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन पेन्सिल सेट, कंपास पेटी, दप्तरं व छत्री संचाचे वाटप करण्यात आले ग्रामस्थ व कोकण कट्टा सदस्य सचिनभाऊ दिवाळे यांच्या पुढाकाराने आयोजन केले गेले मार्गदर्शक व माजी सभापती दत्ताजी कदम व कोकण कट्टा संस्थापक अजितदादा पितळे सदस्य सचिनभाऊ दिवाळे, विजय बाईत मान्यवर उपस्थित होते शाळा व्यवस्थापनाचे अदध्यक्ष मनोज कदम सदस्य सचिन देव, पोलीस पाटील अशोक डोंगरकर गावापातळीचे मुख्य मान्यवर ही आवर्जून उपस्थित राहिले होते. सखाराम घाडीगावकर व बापट सरांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन शाळेतील मुलांचे जिल्हा पातळीवरील विविध विषय व खेळातील प्रगतीची ओळख करुन दिली. दत्ताजी कदमानी कोकण कट्टा संस्थेच्या 25वर्षाच्या अफाट कार्याची ओळख करुन दिली.
संस्थांपक अजितदादा यांनी सचिनभाऊंचा हा शैक्षणिक सामाजकार्याचा वसा आपण ही पुढे न्यायचा आहे व तो ग्रामस्थांनी अंगीकारा असे आवाहन केले सौ. घाडीगावकर, खडपे,
सुतारसर ,सारिका व जागृती डोंगरकर यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले मुलांनी व पालकांनी साहित्य स्वीकारल्यावर आनंद व्यक्त केला.