ऑपरेशन सिंदूरनंतर मागाठाणेत ‘तिरंगा यात्रा’ हाती तिरंगा घेत नागरिकांनी सहभाग नोंदवला

मुंबई – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या भव्य यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी मागाठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. या तिरंगा पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक, तरुण-तरुणी हाती तिरंगा घेऊन जयघोष करीत सहभागी झाले होते.
या तिरंगा यात्रेवेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, संपूर्ण देशभरात याचप्रकारे तिरंगा यात्रा निघत आहे. देशभक्तीने प्रेरित होऊन ही तिरंगा यात्रा आहे. ही लोकांची यात्रा आहे. आपल्या देशावर पाकिस्तान ज्या पद्धतीने हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता त्याला चोख प्रत्युत्तर त्यांच्याच भूमीत घुसून मिसाईलच्याद्वारे दहशतवादी अड्डे उध्वस्त करून दिले. असे शौर्य दाखविणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ज्ञता, आदर व्यक्त करण्यासाठी ही तिरंगा यात्रा आहे. या यात्रेत सर्व समाजाचे लोकं सहभागी झाली आहेत. आम्ही देशासोबत, पंतप्रधान मोदींसोबत आहोत असा संदेश देशभरातील तिरंगा यात्रेतून देताना दिसत असल्याचेही दरेकर म्हणाले.
ही तिरंगा यात्रा गावडे नगर, ए. एन. दुबे मार्ग, कोकणीपाडा, अभ्यासिका, मंदाकिनी नाका, मारुती नगर, अशोक वन, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, ब्रॉड वे,सिद्धार्थ नगर, ठाकूर व्हिलेज, सिंग इस्टेट या मार्गे काढण्यात आली. या प्रसंगी मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा उत्तर मुंबई जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, मागाठाणे मंडळ अध्यक्ष अमित उतेकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *