महाड (मिलिंद माने) महाड औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर रसायन युक्त केमिकल चे पाणी नदीपात्रा त सोडण्याचा उद्योग अनेक कंपन्या करीत होत्या मात्र याचा सुगावा महाड औद्योगिक कार्यालयाला देखील लागत नव्हता अखेर औद्योगिक वसाहत पोलीस कमीत कमी ठाण्याच्या पोलिसांनी पाळत ठेवून महाड औद्योगिक वसाहती मधील असं पुरी गावच्या हद्दीत असणाऱ्या सविती केमिकल्स कंपनी नदीपात्रा त रसायनमित्र पाणी सोडत असल्याचे रंगेहात पकडून कंपनी व्यवस्थापना विरोधात गुन्हा दाखल केला आहे यामुळे प्रदूषणकारी कंपन्या महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या ॲक्शन मोडवर आल्या आहेत
याबाबत अधिक माहिती अशी की महाड औद्योगिक वसाहती मधील केमिकल युक्त कंपन्या वारंवार नदीपात्रात रसायन मिस्त्री सांडपाणी औद्योगिक वसाहती मधील नाल्यांमधून सोडत असल्याने सावित्री नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत होते याबाबत रसायन युक्त केमिकल कंपन्या आम्ही त्यातले नाहीत असा आव आणत होते
महाड औद्योगिक वसाहती मधील अनेक कंपन्या पर्जन्यवृष्टीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडत असल्याच्या नागरिकांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या मात्र औद्योगिक कार्यालयाकडून मात्र याबाबत कोणतीही कारवाई केली जात नव्हती यामुळे नागरिक कमालीचे संतप्त झाले होते अखेर महाड एमआयडीसी पोलिसांनी मागील आठ दिवसापूर्वी औद्योगिक वसाहती मधील एका बंद कंपनीमधून ड्रग्सचा साठा जप्त केल्यानंतर अनेक कंपन्या प्रदूषण करीत असल्याच्या तक्रारी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याकडे प्राप्त झाल्या होत्या.
महाड औद्योगिक वसाहती मधील आपण कोई गावच्या हद्दीमध्ये D. झोन प्लॉट नंबर.१४ या ठिकाणी असणाऱ्या सविती केमिकल्स कंपनी कंपनीचे केमिकल युक्त सांडपाणी नाल्यामध्ये सोडल्याने जवळील नाला मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्याचे महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी एस के मुंडे यांना पाहण्यास मिळाले असता कंपनीमध्ये अचानक पणे केलेल्या कारवाईमध्ये सदरच्या कंपनीमधूनच रसायन युक्त सांडपाणी नाल्यात सोडण्याचे रंगेहात पकडले
महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर८४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम२७०, २७१,२७९,२८९ अन्वये आरोपी संजय यशवंत धुमाळ वय वर्ष६०. राहणार अथर्व वेद सोसायटी मंत्री पार्क जवळ कोथरूड पुणे ३८ यांच्या विरोधात इकबाल चांद का शेख यांनी खबर दिल्यावरून रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कंपनीमध्ये कोणतीही सुरक्षा साधने याचा वापर केलेला दिसून आला नाही तसेच अग्निरोधक उपकरणे कंपनीमध्ये ठेवलेली दिसून आली नाहीत व कंपनीचे केमिकल युक्त सांडपाणी हे नाल्यांमध्ये सोडले त्यामुळे सावित्री नदी दूषित होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी व मानवी जीविका धोका निर्माण केल्याप्रकरणी तपास अधिकारी एस के मुंडे यांनी गुन्हा दाखल केला आहे
महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याने सविता केमिकल्स कंपनी विरोधात केलेल्या कारवाईमुळे रसायन युक्त सांडपाणी करणाऱ्या अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले असून रसायन मिश्रित सांडपाणी कोणतेही प्रक्रिया न करता नाल्यात सोडणाऱ्या बेकायदेशीर कंपन्यांचे धावेदनानले असून आपल्यावर देखील कारवाई होता होण्याची शक्यता असल्याने अनेक कंपन्या आता औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या ॲक्शन मोडवर आल्या असल्या तरी पोलीस मात्र कारवाईसाठी सज्ज झाल्याचे या निमित्ताने पाहण्यास मिळत आहे
महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यामार्फत मालक व कामगार यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून कंपनीमध्ये उत्पादन केलेला मुद्देमालाचे नमुने पोलिसांनी घेतले असून मुंबई कलिना येथील प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून महाड एमआयडीसी पोलीस प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसी कार्यालयामार्फत ही कारवाई केली असली तरी या निमित्ताने महाड औद्योगिक वसाहती मधील लहान व बंद कंपन्यांमध्ये करोडो रुपयांचा मागील आठवड्यात पूर्वी पकडलेला अमली पदार्थाचा साठा येतो कुठून असा प्रश्न आता देखील सर्वसामान्यांना पडला आहे मागील आठवडापूर्वी पकडण्यात आलेल्या अमली पदार्थाच्या साठ्याबाबत महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी आता औद्योगिक वसाहती मधील बंद अवस्थेत असणाऱ्या अनेक कंपन्यांची झाडाझडती घेण्याची मागणी, नागरिकांकडून केली जात आहे