महाड (प्रतिनिधी) महाड दापोली राज्य मार्गावर मागील आठ दिवसात. झालेल्या अपघाताला बांधकाम उपविभाग महाड व संबंधित ठेकेदार जबाबदार असून याबाबत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंबंधी शिरगाव गावचे सरपंच व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात याबाबतचा तक्रार अर्ज दाखल केला आहे
महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रार अर्जानुसार महाड तालुक्यातील महाड दापोली राज्य मार्गावर मागील आठ दिवसात सातत्याने अपघात घडत असून या अपघातामध्ये अनेक निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
महाड दापोली राज्य मार्गावर निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण तुटलेल्या साईड पट्ट्या, अपूर्ण गटारे योग्य दिशादर्शक फलकांचा अभाव या गोष्टी अपघातास प्रामुख्याने कारणीभूत आहे या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट SMC. या कंपनीकडे असून संबंधित कंपनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाडच्या आख्यातारीत काम करते तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागातील उपविभागीय अभियंता तुकाराम सनाळकर यांनी व कार्यकारी अभियंतांनी या रस्त्याच्या त्रुटीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले यामुळे या रस्त्यावरील अपघातासाठी व झालेल्या मृत्यूसाठी SMC. कंपनीचा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकारी जबाबदार आहेत
यामुळे याप्रकरणी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर भारतीय दंड विधान कलम ३०४( अ) नुसार सदोष मनुष्य वधा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा, तसेच सर्व अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच सदर रस्त्याची गुणवत्ता तपासून दोषी कंपन्यांवर कायदेशीर व आर्थिक फसवणूक प्रकरणात कारवाई करण्यात यावी व भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी देखील या तक्रार अर्जामध्ये सोमनाथ ओझर्डे यांनी केली असून याबाबतचा तक्रार अर्ज महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे
शिरगाव चे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी केलेल्या तक्रार अर्जानुसार महाड शहर पोलीस ठाणे याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करते की नाईलाज असतो सोमनाथ ओझर्डे यांना रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागतो हे येत्या काळात पाहण्यास मिळेल