कराड – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त “अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (कराड)” यांच्यातर्फे समाज प्रबोधन मेळावा आणि समाज गौरव सन्मान सोहळा टाऊन हॉल येथील यशवंतराव चव्हाण स्मृती भवनात भव्यदिव्य वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा यांचे वस्ताद श्री वसंतराव य. पाटील यांना त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “समाज गौरव पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला.
श्री. पाटील यांनी श्री गणेश आखाड्याची स्थापना करून अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पदक विजेते तसेच होतकरू मल्ल घडवले आहेत. त्यांच्या या योगदानाचा गौरव रॅमन मॅगसेसे व पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. सौ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आला.
या गौरव समारंभास प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे,प्रा. डॉ. शरद गायकवाड (महावीर विद्यालय, कोल्हापूर),महागायक शाहीर चंदन कांबळे,अभिनेत्री कु. शिवानी मुंडेकर
जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष मा. राम दाभाडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पैलवान नजरुद्दीन नायकवडी,
प्रा. अमोल साठे (आशियाई सुवर्णपदक विजेते व एन.आय.एस. कुस्ती प्रशिक्षक) विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच अंत्री बुद्रुक गावाचे अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी
उपस्थिती लावली होती. या
कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनात अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक संदेशांची आठवण ताजी केली आणि समाजप्रबोधनाच्या दिशेने सकारात्मक ऊर्जा दिली.