महाड (मिलिंद माने) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका दररोज चालू असताना आज सायंकाळी सहाच्या सुमारास महाड कडून पुण्याकडे जाणाऱ्या व्हॅगनार कार ने मालवाहतूक ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेमध्ये वैद्यकीय महिला अधिकारी जागी मृत्यू पावल्याची घटना लाख पाले गावाजवळ घडली
याबाबत अधिक माहिती अशी की. महाड कडून मुंबई बाजूकडे जाणाराMH.४३.Y.६०५६ हा मालवाहतूक ट्रक महामार्गावर धावत असताना पाठीमागून येणाऱ्या व पुण्याकडे जाणाऱ्याMH.१४.MC९८५९ या व्हॅगनार कार ने मालवाहतूक ट्रक ला पाठीमागून जोरात दिलेल्या धडकेत कार मधील डॉक्टर पल्लवी पळशीकर वय वर्ष ३५ राहणार लातूर. यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असणारे डॉक्टर विशाल रमेश बडे वय वर्ष ३० राहणार. अनपटवाडी पारगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड हे जखमी झाले आहेत.
महामार्ग वाहतूक शाखा महाड येथील वाहतूक पोलिसांना याबाबतची घटना कळताच त्यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन व्हॅगनार कार मधून प्रवास करणाऱ्या व जखमी झालेल्या डॉक्टर विशाल बडे यांना रुग्णालयात हलविण्यास मदत केली.