‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार अंकिता वालावलकरला म्हणाला ‘हडळ’, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Spread the love

बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व आणि त्यात सहभागी झालेले सदस्य कायम चर्चेत असतात. हे सदस्य सतत एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतात. लवकरच या सदस्यांपैकी एकजण बोहल्यावर चढणार आहे. ती म्हणजे अंकिता वालावलकर. ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर आल्यानंतर अंकिताने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत खुलासा केला. अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव कुणाल भगत असं असून तो संगीत दिग्दर्शक आहे. मालिका आणि चित्रपटातील गाणी तो संगीतबद्ध करतो. फेब्रुवारी महिन्यात अंकिता कुणालशी लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या दोघं एकत्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशातच अंकिता आणि धनंजय पोवारचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये धनंजय अंकिताला हडळ म्हणताना दिसत आहे. कोल्हापुरचा ढाण्या वाघ, डीपी दादा अशी ओळख असणाऱ्या धनंजय पोवारने अंकिताचा होणारा नवरा कुणाल भगतची नुकतीच भेट घेतली. यावेळी अंकिता नव्हती. ती कोकणात होती. म्हणून धनंजय आणि कुणालने अंकिताला व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉल केल्यानंतर धनंजय पोवार मजेत अंकिताला म्हणाला, “आम्ही इतके मजेत वेळ घालवत आहोत. तुला पटणार नाही. पण, मुंबईतील हडळ कोकणात गेल्यामुळे मुंबईमध्ये दोन महापुरुष स्वतंत्ररित्या राहत आहेत.” यावर हसत अंकिता म्हणाली, “असू दे.” त्यानंतर धनंजय म्हणाला, “मी कुणालला फोन केला. कुणाल म्हणाला, तिच्या कुठे नादाला लागलाय. हडळ कोकणात गेलीये. तुम्ही या आपण निवांत राहू.” अंकिता म्हणाली, “हडळ म्हणाला?” त्यावर धनंजय मजेत म्हणाला, “मी चिटकिणीवर आलो होतो. पण हा हडळ म्हणाला.” हे ऐकून कुणाल मागे हात जोडून अंकिता मी असं म्हणालो नाही धनंजय म्हणाला असे हाताने इशारे करून दाखवत आहे. त्यामुळे अंकिता धनंजयला म्हणाली, “तो बघा तुमच्या मागून माझ्या पाया पडतोय.” त्यावर धनंजय म्हणतो की, लग्नाच्या आधीच त्याला हडळ लाभली आहे. धनंजय आणि अंकिताच्या या मजेशीर व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेले सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी सतत पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील वाद हे बाहेरदेखील दिसत आहेत. निक्की तांबोळी आणि आर्या जाधवमधील वाद अजूनही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर दोघी एकमेकांवर टीका करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *