‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील भुवनेश्वरी व अक्षरा या सासू-सुनेची जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. सुनेला त्रास देण्यासाठी भुवनेश्वरी नेहमीच विविध प्रयत्न करताना दिसते. मालिकेत दोघींमध्ये कायम वाद होत असल्याचं पाहायला मिळतं. पण, खऱ्या आयुष्यात या दोघींमध्ये फारचं सुंदर नातं आहे. आज ऑनस्क्रीन सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने खास पोस्ट शेअर करत कविता यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवानीने ( Shivani Rangole ) कविता मेढेकरांसाठी सुंदर पोस्ट लिहित त्यांच्याबरोबर अनसीन फोटो देखील शेअर केले आहेत. छोट्या पडद्यावर कविता मेढेकरांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘उंच माझा झोका’, ‘चार दिवस सासूचे’, ‘राधा ही बावरी’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. सध्या अभिनेत्री ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका गाजवत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायिका या अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने खास पोस्ट शेअर केली आहे. शिवानी रांगोळे ( Shivani Rangole ) लिहिते, “सुंदर आणि सर्वांवर नेहमीच प्रेम करणाऱ्या माझ्या आयुष्यातील गोड व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! जे योग्य वाटतंय ते करा ही तुझी शिकवण आम्हाला खूप काही शिकवून जाते. ताई तुझ्याकडून आम्हाला कायमच प्रेरणा मिळते. आपल्याला भविष्यात सुद्धा अशाच नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळत राहूदेत” अभिनेत्रीच्या या पोस्टवर कविता मेढेकरांनी थँक्यू शिवानी! लव्ह यू अशी कमेंट केली आहे. यावरून या दोघींमध्ये ऑफस्क्रीन किती सुंदर नातं आहे हे स्पष्ट होतं. दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, आता अक्षराच्या ( Shivani Rangole ) मनात चारुलताच खरी भुवनेश्वरी संशय निर्माण झाला आहे. पण, भुवनेश्वरी मोठ्या हुशारीने संपूर्ण सुर्यवंशी कुटुंबासमोर सुनेला खोटं ठरवणार आहे. आता अक्षराचा खरेपणा अधिपतीच्या तरी लक्षात येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.