आमदार प्रताप सरनाईक यांना विविध संस्था – समाज संघटनांचा पाठिंबा जाहीर

Spread the love

विकासकामांच्या जोरावर अल्पसंख्याक बांधवही प्रचारात सक्रिय

भाईंदर / प्रतिनिधी
ओवळा माजिवडा विधासभा मतदारसंघाचे आमदार – शिवसेना , भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस , आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप सरनाईक यांना मतदारसंघातील विविध संस्था , समाज घटक , सामाजिक संस्था यांचा पाठींबा दरदिवशी वाढत आहे. गेल्या १५ वर्षात झालेली प्रचंड विकासकामे आणि पुढील ५ वर्षाचे संकल्प पत्र पाहता आमदार सरनाईक यांचा विजय निश्चित असून त्यांना ठाणे – मीरा भाईंदर मधील यादव समाज तसेच , अल्पसंख्याक संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे , असा निर्धार यावेळी करण्यात आला. ‘सबका साथ – सबका विकास – सबका विश्वास’ हे सूत्र घेऊनच आमदार सरनाईक यांनी आजवर विकासाची कामे सर्वाना सोबत घेऊन केली असल्याने त्यांना व्यापक जन समर्थन मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
यादव समाज या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राहतो. विशेष म्हणजे ‘फेक नॅरेटिव्ह’मुळे यातील काही लोक लोकसभा निवडणुकीत हे महाविकास आघाडीसोबत गेले होते. पण आता त्यांनी शिवसेना – भाजप महायुतीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांची विकासकामे दिसत आहेत आणि त्यांची प्रभावी कार्यशैली , मतदारसंघातील जनतेशी त्यांचा असलेला थेट संपर्क यामुळे आम्ही त्यांना समर्थन देत आहोत व त्यांच्या सक्रिय प्रचारात उतरायचे ठरवले आहे , आमचे प्रत्येक मत हे आमदार प्रताप सरनाईक यांना मिळणार आहे , असे यादव समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
प्राचीन काळात माणसाच्या जीवनात गायीचं अद्वितीय महत्त्व होतं. वैदिक काळात गायींना धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे गायीला कामधेनूही म्हटलं गेलं. राज्यातील विविध भागात गायीच्या विविध प्रजाती आढळतात. गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी घेण्यात आला व तसा शासन निर्णयही लगेच प्रसिद्ध करण्यात आला होता. भारतीय परंपरेत गायीला प्रचंड महत्त्व आहे. त्याचा हवाला देऊनच सरकारने हा निर्णय घेतल्याने यादव समाज हा खुश आहे. या निर्णयाने यादव समाज आणखी प्रभावित झाला. राज्य सरकार व आमदार सरनाईक यांच्या विकासकामांचा धडाका यामुळे आम्ही यादव समाज आमदार सरनाईक यांना एक गठ्ठा मतदान करणार , असेही पदाधिकारी म्हणाले.
आमदार प्रताप सरनाईक यांनी मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम केले आहे. कोणताही भेद त्यांनी केला नाही. सर्व समाजघटकांसाठी त्यांनी विकासाची अनेक कामे केली आहेत. त्यामुळे सर्व समाजातून त्यांना समर्थन , पाठींबा मिळत आहे. गेल्या १५ वर्षात आमदार प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण मतदारसंघात चौफेर विकास केला आहे. ठाणे – मीरा भाईंदर मेट्रो , सूर्या पाणी योजना , नाट्यगृह , कॅशलेस हॉस्पिटल , सिमेंट काँक्रीटचे रस्ते , विविध समाज भवने , चांगली उद्याने , चौपाटी विकास यासह असंख्य विकास कामे झाली आहेत. प्रत्येक समाज घटकासाठी झालेली विकासकामे व त्यांचा दांडगा जनसंपर्क या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे. अल्पसंख्याक बांधवांसाठीही विकासाची कामे झालेली आहेत. त्यामुळे विविध अल्पसंख्याक समाजाच्या संघटनांनी आमदार सरनाईक यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *