वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा रामेश्वर ढाकणे यांचे वाहन चालकांना आवाहन

महाड – प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी कल्याण मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर महाराष्ट्रातील सर्वच रस्त्यांवरील वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला महामार्गावर किंवा इतर कोणत्याही रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे संभाव्य अपघात टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे यांनी केले आहे. महामार्गावर किंवा इतर कोणत्याही रस्त्यांवर अपघात होऊन निष्पाप जीवांचा मृत्यू अनेकदा चालकांच्या चुकांमुळे होत असतो यामुळे रस्त्यांवर वाहन चालवताना वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाहणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वीच मुरबाड रस्त्यावर ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात सुमारे अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर रस्ता सुरक्षेचा प्रश्न समोर आला वाहन चालक वाहन चालवताना वेग-मर्यादा पाळत नाहीत त्यामुळे अनेक वेळा ओव्हरटेकच्या नादात अपघात होत असतात अनेक अवजाड वाहने ओव्हरलोड वाहतूक करत असतात शिवाय रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज न घेता वेगमर्यादा वाढवून कार चालक प्रवास करत असतात यामुळे अपघात होतात यातून वाचण्यासाठी वाहन चालकांनी वाहतूक सुरक्षेचे त्याचप्रमाणे वाहन कायद्याचे देखील पालन करणे आवश्यक आहे
महामार्ग किंवा इतर रस्त्यांवर वाहन चालवताना वाहन चालकांनी वेगमर्यादा पाली पाहिजे रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज घेतला पाहिजे मोबाईलवर बोलणे टाळले पाहिजे, दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे आवश्यक आहे, वाहनांना त्यांना दिलेल्या दिव्यांव्यतिरिक्त इतर दिवे लावणे योग्य नाही त्यामुळे अशा वाहनांमुळे कारवाई करण्याचे काम महामार्ग वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे. वाहतूक सुरक्षा कार्यक्रमांतर्गत वाहनचालकांमध्ये जनजागृती केली जात आहे असे देखील रामेश्वर ढाकणे यांनी सांगितले. वाहन चालवताना वाहनाचा ताबा आपल्या हातामध्ये असतो त्यामुळे अपघात टाळणे देखील आपल्याच हातात असते असे देखील त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *