मीरा-भाईंदरमध्ये १६ एप्रिलला परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा लोकदरबार

मीरा-भाईंदर : शहरातील नागरिकांच्या विविध नागरी समस्या आणि प्रशासकीय अडथळ्यांचे तात्काळ निवारण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने मीरा-भाईंदर शहरात ‘लोकदरबार’चे आयोजन करण्यात आले आहे.
हा लोकदरबार गुरुवार, १६ एप्रिल २०२६ रोजी भाईंदर पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पार पडणार आहे.
या लोकदरबारामध्ये नागरिकांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, वाहतूक, शासकीय कागदपत्रे, तसेच इतर नागरी व प्रशासकीय समस्यांबाबत थेट मंत्र्यांसमोर मांडणी करण्याची संधी मिळणार आहे. संबंधित विभागांचे अधिकारी देखील उपस्थित राहणार असून तात्काळ निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मीरा-भाईंदर शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने या लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *