महाड (प्रतिनिधी) ऐन उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढत असताना वन खात्याच्या राखीव वनक्षेत्रात तसे खाजगी जागांमध्ये देखील वणवे लागून वनसंपत्ती नष्ट होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असतानाच आज छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाला देखील लागलेल्या वणव्यामुळे रायगड किल्ल्यावर पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या तसेच विद्युत केबल देखील अनेक ठिकाणी जळून नष्ट झाल्या आहेत मात्र सर्व काही नष्ट झाल्यानंतरच वनखात्याचे अधिकारी वणवा विझवण्यासाठी रायगड किल्ल्यावरदाखल झाले रायगड जिल्ह्यातील सर्व डोंगरमाथ्यांवर जानेवारी महिन्यापासूनच वणवे लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून आत्तापर्यंत सर्वच डोंगर माथ्यावरील वनसंपदा जळून नष्ट झाली आहे असाच प्रकार आज छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर दुपारच्या सुमारास घडला अज्ञात व्यक्तीने लावलेल्या वणव्यामुळे किल्ले रायगडावर पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या प्लॅस्टिकच्या होत्या त्या जमिनी खालीएक ते दीड फूट खोदून जमिनीत पुरणेआवश्यक असताना देखील ठेकेदाराने त्या उघड्यावर ठेवल्याने आज वणव्याच्या भक्ष स्थानी पडल्या त्याच पद्धतीने विद्युत केबल देखील उघड्यावर ठेवल्याने त्या देखील काही ठिकाणी आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे पाहण्यास मिळाले
रायगड प्राधिकरण जबाबदार!
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर ज्या प्रमाणात कामे करताना रायगड प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काम केले असते तर पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या व विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत केबल या जमिनीत टाकल्या असत्या तर आज किल्ल्यावर लागलेल्या वणव्याचा विळख्यात पडल्या नसत्या एकंदरीत रायगड प्राधिकरणाचे काम आंदळ दळते कुत्र पीठ खातय या पद्धतीचे असल्याचे यावरून अनेक पर्यटकांनी व शिवभक्तांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केलेहिरकणी वाडी पासून महादरवाजापर्यंत वणवा! छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर हिरकणी वाडी पासून लागलेला वणवा हा वाऱ्याच्या वेगाने थेट महादरवाजापर्यंत गेल्याने पायरी मार्गावरून जाणारी विद्युत वाहिन्या व पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या देखील आगीच्या भक्षस्थानी पडल्या
टकमक टोक मात्र वाचले! किल्ले रायगडावर लागलेला आगीचा वणवा हा केवळ टकमक टोकापर्यंत गेला नाही त्यामुळे त्या बाजूचा भाग हा आगीच्या भक्षस्थानी पडला नाही मात्र किल्ल्याच्या हिरकणी वाडीकडील बाजूचा भाग पूर्ण जळून नष्ट झाला आहे
आग एकीकडे तर वन खाते दुसरीकडे!
किल्ले रायगडावर लागलेली आग ही हिरकणी वाडी पासून महादरवाजापर्यंत लागली असताना वन खात्याचे अधिकारी मात्र रायगड रोपवे ने गेल्याचे अनेक पर्यटकांनी व शिवभक्तांनी सांगितले मात्र पायरी मार्गावरून गेले असते तर कदाचित पायरी मार्गावरून जाणारी विद्युत वाहिन्या व पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्या या आगीच्या भक्षस्थानी पडल्या नसत्या त्यामुळे वन खात्याचा कारभार कसा चालतो हे यावरून सिद्ध होत आहे