महाड (प्रतिनिधी) राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेले व राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मित निधन झाले आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाची( महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) विभागाची गाडी महाडच्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात धुळखात पडल्याची धक्कादायक माहिती पाहण्यास मिळाली
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ उर्फ भाई संभाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत ग्रामीण भागात पर्यावरण व वातावरणीय बदल घडविण्यासाठी ग्रामीण भागात बांबू प्रकल्प राबवावे या उद्देशाने माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सुसज्ज अशी डिस्प्ले व्हॅन बनविण्यात आली
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळामार्फत बांबू प्रकल्प राबविण्यासाठी MH. ०१EM.९४९० ही सुसज्ज व्हॅन महाड तालुक्यातील ग्रामीण भागात काही दिवस शेतकऱ्यांना या गाडी मार्फत बांबू लागवडीचे महत्त्व पटवून देण्यासाठी चित्रफिती द्वारे मार्गदर्शन करण्यात आले मात्र आता वर्ष झाले ही गाडी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील विश्रामगृहात एका अडगळीच्या जागेत धुळखात पडून आहे
माझी वसुंधरा योजनेअंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या संकल्पनेतून साकारलेल्या या डिस्प्ले गाडीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी गंगाधर फडणवीस, व तत्कालीन उपमुख्यमंत्री पण नुकत्याच आकस्मिक मृत्य झालेले अजितदादा पवार या सर्वांचे छायाचित्र या डिस्प्ले व्हन वर आहे मोठ्या थाटामाटात या व्हॅन चे अनावरण महाड मध्ये करण्यात आले होते मात्र मागील सहा महिन्यापासून लाखो रुपयांची किमतीऐवज असलेली डिस्प्ले व्हॅन महाडच्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात अडगळीच्या जागेत धुळखात असून याबाबत शासकीय विश्रामगृहात कर्मचाऱ्यांना विचारले असता याबाबत कोणतीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले
एकंदरीत भाईंचे मुख्यमंत्रीपद गेले व दादांचे दुःखद निधन झाले आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी व तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून साकार झालेली बांबू डिस्प्ले व्हॅन मात्र भंगार अवस्थेत जाण्याची चिन्हे दिसत आहे