गॅस टंचाईविरोधात भाईंदरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

रस्त्यावर चूल पेटवून भाकरी; ‘नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?’ घोषणांनी परिसर दणाणला

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी (६ एप्रिल) भाईंदर (पूर्व) येथील गोल्डन नेस्ट सर्कल येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या निर्देशानुसार हे आंदोलन पार पडले. शहराध्यक्ष इक्बाल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महासचिव अनिल भगत, यास्मीन खान यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ‘नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी गोल्डन नेस्ट सर्कल येथे प्रत्यक्ष चूल पेटवून भाकरी तयार करत गॅस टंचाईविरोधात अनोखा निषेध नोंदविला. नागरिकांवर ओढवलेल्या परिस्थितीचे जिवंत चित्र उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच तहसीलदारांना भाकरी, कांदा व मिरचीसह निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मीरा-भाईंदर शहरात गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून अनेक ठिकाणी जादा दराने सिलेंडर विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात उमेश शिंदे, संतोष तांबे, शकीला शेख, साजिदभाई, विजयभाई तलरेजा, नसरिन खान, पंकज इंगोले, सुरज इंगोले, रक्षक मनवर, राहुल डोहीफोडे, पिटर डिसोजा, नासिर शेख, इम्तियाज हुसेन जोया, सुनील भगत, स्वप्नाली म्हात्रे, धवल वाघेला, सुनील गवळी, नटराज सूर्यवंशी, इब्राहीम महाडिक, झियाउद्दीन शेख, शबनम शेख, फैज अबुल, इरफान शेख, विश्वनाथ तायडे यांच्यासह महिला-पुरुष कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *