महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांची मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक रुग्णालयाला अचानक भेट; त्रुटी दूर करण्याचे आश्वासन

मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक रुग्णालयाला महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी अचानक भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान रुग्णालयातील विविध त्रुटींबाबत संबंधित कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांशी संवाद साधत त्यांच्याकडून उपचार, सुविधा आणि अडचणींबाबत माहिती घेतली. रुग्ण आणि डॉक्टरांशी चर्चा करताना काही त्रुटी निदर्शनास आल्याचे त्यांनी नमूद केले. या समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन महापौर डिंपल मेहता यांनी दिले. रुग्णांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा मिळावी, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. या अचानक भेटीमुळे रुग्णालय प्रशासनात चांगलीच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *