कोकणात भाजपमधील असंतुष्ट ठाकरे गटाच्या वाटेवर

Spread the love

अलिबाग- उमेदवारी न मिळालेल्या भाजपमधील असंतुष्ट शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. राजन तेली पाठोपाठ आता बाळ मानेही ठाकरे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे कोकणात भाजपला निवडणुकीआधीच धक्के बसले आहेत. असंतुष्टांना थोपवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असणार आहे. कोकणात महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना शिंदे गटाला मोठा वाटा मिळाला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. पाच वर्षे उमेदवारी मिळणार या आशेवर असलेल्या, पण उमेदवारी मिळणार नसलेल्या असंतुष्ट नेत्यांनी बंडाचा पावित्रा घेतला आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरीपाठोपाठ रायगड जिल्ह्यातही भाजपमध्ये बंडखोरी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधून भाजपकडून राजन तेली यांना उमेदवारी हवी होती, मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळाला, दिपक केसरकर यांना पुन्हा महायुतीचे उमेदवार म्हणून संधी मिळणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे नाराज झालेल्या राजन तेली यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्गात भाजपला मोठा धक्का बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *