टीबी मुक्त भारत अभियानाला वेग; भाईंदरमध्ये जनजागृती कार्यक्रम संपन्न

भाईंदर : क्षयरोग निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या टीबी मुक्त भारत अभियानाच्या १०० दिवसीय मोहिमेअंतर्गत विनायक नगर आरोग्य केंद्र, भाईंदर पश्चिम येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी सहभाग नोंदवून नागरिकांना क्षयरोगाविरोधात सजग राहण्याचे आवाहन केले. यावेळी महापौर सौ. डिंपल मेहता, नगरसेविका अ‍ॅड. श्रद्धा कदम, कु. मानशी शर्मा, सौ. मेबल कोरिया तसेच नगरसेवक परेश शाह उपस्थित होते.
मीरा-भाईंदर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना क्षयरोग तपासणी, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. लवकर निदान आणि नियमित उपचारांमुळे टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो, याबाबतही जनजागृती करण्यात आली.
निरोगी समाज घडविण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *