उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन!
महाड (प्रतिनिधी) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६६ वरील ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे होणारे अपघात बंद होण्यासाठी येत्या ८ दिवसात . बंद न झाल्यास चक्काजाम करण्याचा इशारा दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांना प्रत्यक्ष भेटी अंतिम निवेदन सादर केले
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर दुचाकी स्वार व चार चाकी वाहनांना अपघाताच्या घटना घडल्या असून या अपघातामुळे अनेक जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले तर अनेक प्रवासी कायमचे जायबंदी झाले आहेत मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणावर अवैध्य पणे ओव्हरलोड कोळसा वाहतूक चालू असल्याने अखेर आज याबाबत उपप्रादेशिक परिवहन प्रभारी अधिकारी माधव सूर्यवंशी यांना पेण येथील कार्यालयात त जाऊन प्रत्यक्ष निवेदन सादर केले
पेण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी यांना दिलेल्या लेखी निवेदनात येत्या आठ दिवसात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील. ओव्हरलोड कोळसा वाहतूक बंद न झाल्यास चक्काजाम करण्याचा इशारा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला