मीरा-भाईंदर महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित

 

मिरा भाईंदर – (प्रमोद देठे) मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून महापौर पदासाठी डिंपल मेहता, तर उपमहापौर पदासाठी ध्रुव किशोर पाटील यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे.
दुसरीकडे, काँग्रेस–शिवसेना (शिंदे) आघाडीनेही आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. महापौर पदासाठी काँग्रेसच्या रुबिना शेख, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या वंदना पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीत एकूण ९५ नगरसेवक मतदान करणार आहेत. यामध्ये भाजपकडे ७९ मते, तर काँग्रेस–शिवसेना (शिंदे) आघाडीकडे १६ मते आहेत. विद्यमान संख्याबळ पाहता भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
त्यामुळे आगामी अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी डिंपल मेहता महापौर तर ध्रुवकिशोर पाटील उपमहापौर म्हणून जबाबदारी सांभाळतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यावेळी बोलताना उपमहापौर पदाचे उमेदवार ध्रुवकिशोर पाटील म्हणाले,
“या विश्वासाबद्दल भाजपचे मनापासून आभार. मीरा-भाईंदर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *