“पाणी आडवा पाणी जिरवा “घोषणा फक्त कागदावरच! निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे काळ नदीवरील . कुंभे शिवथर येथील बंधाऱ्याला गळती!
६० लाख रुपये पाण्यात
महाड (प्रतिनिधी) उन्हाळ्यात शेतकऱ्यांना. दुबार शेती तसेच भाजीपाल्यासारखे नगदी पिके घेता यावी यासाठी जलसंधारण विभागामार्फत महाड तालुक्यातील काळ नदीवर कुंभे शिवथर येथे सिमेंट काँक्रीट चा ६० लक्ष रुपयांचा बंधारा बांधला होता मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वर्षातच बंधाऱ्याला गळती लागली असून पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्याला आवश्यक असणाऱ्या लोखंडी प्लेट न लावल्याने पावसाळा संपण्यापूर्वी बंधाऱ्यातून पाणी निघून गेले आहे त्यामुळे “पाणीआडवा पाणी जिरवा” ही राज्य शासनाची घोषणा हवेतच विरल्याचे . या गावातील . शेतकऱ्यांनी याबाबत शासनाच्या धोरणाबाबत उदासीनता व्यक्त केली आहे
उन्हाळ्यात जाणवणारी तीव्र पाणीटंचाई व पाळीव जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे तसेच बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी भाजीपाल्यासारखे नगदी पिके घेता यावी व शेतकरी. सदन व सुख समृद्ध व्हावा या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत महाड तालुक्यातील कुंभे शिवथर. या गावातील काळ नदीवर मागील वर्षी सिमेंट काँक्रेट चा बंधारा बांधण्यात आला होता मात्र वर्षभरात या बंधाऱ्यात गळती लागली असून बंधाऱ्यात पाणी थांबत तर नाहीच मात्र पाणी अडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लोखंडी प्लेट बंधाऱ्याला न लावल्यामुळे बंधाऱ्यात पावसाळ्यापूर्वी अडवण्याचे पाणी बंधाऱ्यातून निघून गेले आहे.

राज्य शासनाचे उद्दिष्ट मात्र कागदावरच?
काळ नदीवर कुंभे शिवथर या ठिकाणी ६० लक्ष रुपये खर्चून सिमेंट काँक्रेटचा बंधारा बांधण्यात आला होता मात्र या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बंधाऱ्याला गळती तर लागली मात्र बंधाऱ्याची पाणी अडवण्यासाठी ज्या लोखंडी प्लेट बंधाऱ्याला लावाव्या लागतात त्या लावण्याचे तसदी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी न घेतल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी पावसाळा संपताच बंधाऱ्यातून निघून गेले आहे परिणाम बंधारा आता कोरडा पडला आहे.
याबाबत माणगाव येथील जलसंधारण उपविभागीय कार्यालयात. या गावातील शेतकऱ्यांनी बंदराच्या काम अर्धवट अवस्थेत व चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पावसाळी पाणी शिरल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे त्यांनी याबाबत वारंवार तक्रार करून देखील ना बंधाऱ्याचे अर्धवट अवस्थेतील बांधकाम पूर्ण केले ना बंधाऱ्याला पाणी अडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लोखंडी प्लेट लावण्याचे काम जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी न केल्याने बंधाऱ्यातून पाणी पूर्णपणे वाहून गेल्याने उन्हाळ्यात नगदी पीक घेण्याची तयारी ज्या शेतकऱ्यांनी केली होती त्या शेतकऱ्यांना आता नगदी पिके घेता येणार नाहीत
काळ नदीवरील कुंभे शिवथर येथील बंधाऱ्याला लागलेली गळती बंद करण्याचे काम जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला करण्यास सांगितले आहे मात्र आमच्या शेतीचे झालेले नुकसान पहिले भरून द्यावे नंतर बंधाऱ्याच्या गळतीचे काम चालू करावे अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे
माणगाव येथील जलसंधारण उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याचे काम चालू असताना ठेकेदाराच्या कामाकडे. व गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्याने बंधाऱ्याला गळती लागली असून बांधलेला बंधाऱ्याचा उपयोग ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना होणार नसल्याने “पाणी आडवा पाणी जिरवा” हा राज्य शासनाचा उपक्रम कागदावरच राहिला असून ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांनी मात्र आपले . खिसे भरण्याचे काम केले यामुळे शासनाचे ६०लक्ष रुपयांचे नुकसान झाले. अशी चर्चा आता या परिसरात ग्रामस्थांकडून चर्चिली जाऊ लागली आहे