महाड (मिलिंद माने) रायगड दर्शन घेऊन परत जाताना अहिल्यानगर येथील शिवभक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलर ला रायगड जवळील पुनाडे घाटात अवघड वळणावर टेम्पो ट्रॅव्हलर चा ब्रेक फेल झाल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात यामधून प्रवास करणाऱ्या १८प्रवाशांपैकी पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत त्यातील तिघांना माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे
अहिल्यानगर येथूनMH.१२.MH.६७६३ या क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅव्हलर मधून१८. शिवभक्त रायगड किल्ला पाहण्यात आले होते रायगड किल्ला पाहून झाल्यानंतर सायंकाळी ते परतीच्या प्रवासात माणगाव मार्गे पुण्याकडे जात असताना रायगड माणगाव रस्त्यावरील पुनाडे घाटात अवघड वळणावर टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने चालकाला गाडीवरचा वेग नियंत्रणात आणणे अशक्य झाल्याने हा टेम्पो उलटा झाला सुदैवाने यातून प्रवास करणाऱ्या पाच प्रवासी जखमी झाली असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले त्यामधील १) राहुल नागरे , २) अमोल फडतरे ,३) आसाराम
तोगे . या ३ शिवभक्तांना पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलविण्यात आल्याची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मोरे यांनी सांगितले इतर शिवभक्तांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किरकोळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेचे वृत्त कळताच किल्ले रायगड हॉटेल व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख तसेच शिराज सय्यद व किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी यांनी टेम्पो ट्रॅव्हलर मधील शिवभक्तांच्या उपचारासाठी तातडीने धाव घेऊन त्यांना मदत केली तसेच रात्रीचा अंधार असल्याने व या शिवभक्तांना जेवण व चहा नाष्टा याची मदत करण्याचे काम किल्ले रायगड हॉटेल व्यवसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले