नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन नबीन यांनी नवी दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे (मंत्री दर्जा) अध्यक्ष तथा आमदार प्रविण दरेकर यांनी नितीन नबीन यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप नेते विनोद तावडे, भाजप नेते प्रकाश जावडेकर, मंत्री गिरीश महाजन, मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री गणेश नाईक, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार विक्रांत पाटील, आमदार चित्राताई वाघ, माजी खासदार डॉ. भारती पवार, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नितीन नबीन यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या संघटनात्मक पातळीवर नव्या पर्वाची सुरुवात होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नबीन यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरेल, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.