वंचित बहुजन आघाडीची पदयात्रा; ‘आता शांत बसायची वेळ नाही’— उमेश शिंदे यांचे आवाहन

 

मीरा–भाईंदर (प्रतिनिधी): अन्याय, दुर्लक्ष आणि दडपशाहीविरोधात सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मीरा–भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ मध्ये प्रभाग क्रमांक २३/ड मधून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार उमेश रमेश शिंदे यांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ही पदयात्रा सोमवार, १२ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू होणार असून मोरवा गाव येथून सुरुवात होऊन सुभाषचंद्र बोस मैदान, ब्रह्मदेव मंदिर, स्मशानभूमी, परशुराम चौक मार्गे मुंबादेवी मंदिर, आंबेडकर नगर येथे समाप्त होणार आहे. यावेळी पक्षाची निवडणूक निशाणी ‘गॅस सिलेंडर’ केंद्रस्थानी असणार आहे.

उमेश शिंदे यांनी सांगितले की, ही पदयात्रा कोणत्याही एका उमेदवारापुरती मर्यादित नसून कामगार, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी व स्वाभिमानासाठीचा हा लढा आहे. “आज नाही तर कधीच नाही; परिवर्तनाची सुरुवात जनतेच्या सहभागातूनच होईल,” असे त्यांनी नमूद केले.

महानगरपालिकेतील प्रलंबित प्रश्न, मूलभूत सुविधांचा अभाव आणि दुर्लक्षित घटकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ही पदयात्रा महत्त्वाची ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *