राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून मुंबईत संघटनात्मक बांधणीला गती

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) मुंबई विभागीय प्रदेशाच्या वतीने आज, ५ जानेवारी २०२६ रोजी मलबार हिल येथे महत्त्वाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पक्षाच्या संघटन बळकटीसाठी आनंद सोनवणे (मलबार हिल), अजित कदम (भायखळा) आणि राजेश बनसोड (वरळी) यांची प्रभारी तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीपत्रांचे वितरण प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे, प्रभारी मुंबई अध्यक्ष मिलिंद अण्णा कांबळे आणि सहअध्यक्ष सोहेल सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मुंबई उपाध्यक्ष उत्तमराव माने, दक्षिण मुंबई महिला अध्यक्ष वनिता तोंडवलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवीन नियुक्त प्रभारी तालुका अध्यक्षांकडून मुंबईतील पक्षसंघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
ही माहिती दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष रुपेश खांडके यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *