प्रभाग २२३ मध्ये महायुतीचा प्रचार वेगात; खासदार मिलिंद देवरा यांचे उमरखाडी येथे मार्गदर्शन

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२३ मधून शिवसेना–भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रिया रुपेश पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी उमरखाडी येथे भेट देत महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी प्रभागातील मतदारांपर्यंत विकासाचे मुद्दे प्रभावीपणे पोहोचवण्याचे आवाहन केले. “महायुती ही विकास, स्थैर्य आणि विश्वासाची युती असून, प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ पातळीवर सक्रिय राहून सौ. प्रिया पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे देवरा यांनी सांगितले.
या प्रसंगी शिवसेना, भाजपमधील पदाधिकारी, स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग २२३ मध्ये महायुतीचा प्रचार अधिक गतीने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *