मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : जनजागृतीवर भर, SVEEP पथकाची महत्त्वपूर्ण बैठक

 

 

मिरा-भाईंदर – मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार (२ जानेवारी २०२६) रोजी महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) पथकाची सविस्तर आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत शहरातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः नवमतदार, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदार यांचा निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आखण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.

मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत योग्य व सविस्तर माहिती देणे, मतदान केंद्रांविषयी जागरूकता निर्माण करणे, तसेच सोशल मीडिया, प्रत्यक्ष संपर्क मोहिमा, पोस्टर, बॅनर, व्हिडिओ संदेश आदी माध्यमांचा प्रभावी वापर करण्याबाबतही चर्चा झाली.

लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने निर्भय व उत्साहाने मतदान करावे, या उद्देशाने SVEEP पथकाच्या माध्यमातून प्रभावी नियोजन व काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *