कल्याण–डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले असून, भाजपाचे तब्बल १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग असून, विविध प्रभागांत भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. स्थानिक पातळीवरील संघटन, समन्वय आणि रणनीतीचा हा परिणाम असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
बिनविरोध निवडून आलेले भाजपाचे उमेदवार :
रंजना पेणकर – प्रभाग २६ ब
आसावरी नवरे – प्रभाग २६ क
मंदा पाटील – प्रभाग २७ अ
ज्योती पाटील – प्रभाग २४ ब
रेखा चौधरी – प्रभाग १८ अ
मुकंद (विशू) पेडणेकर – प्रभाग २६ अ
महेश पाटील – प्रभाग २७ ड
साई शेलार – प्रभाग १९ क
दिपेश म्हात्रे – प्रभाग २३ अ
जयेश म्हात्रे – प्रभाग २३ ड
हर्षदा भोईर – प्रभाग २३ क
डॉ. सुनिता पाटील – प्रभाग १९ ब
पूजा म्हात्रे – प्रभाग १९ अ
रविना माळी – प्रभाग ३० अ
मंदार हळबे – प्रभाग २६ ड
या यशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण–डोंबिवली महापालिकेत भाजपाची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.