महाड( प्रतिनिधी )महाड औद्योगिक वसाहती मधील प्रतिष्ठित कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुदर्शन केमिकल कंपनीमध्ये सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वायू गळती झाल्याची घटना नुकतीच घडली असून सुदर्शन केमिकल कंपनीतील क्लोरीन वायूच्या गळतीने परिसरामध्ये एकच खळबळ उडाले असून कंपनीतील सर्व कामगारांना कंपनीच्या बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस प्रशासन व व यंत्रणेने धाव घेतली.
प्राथमिक माहितीनुसार. महाड औद्योगिक वसाहती मधील सुदर्शन केमिकल कंपनीमधील कामगारांना सुरक्षित रित्या बाहेर काढण्याचे प्रयत्न कंपनी व्यवस्थापक यांच्याकडून करण्यात येत आहेत. सुदर्शन केमिकल कंपनीच्या वायुगळतीमुळे किती कामगार जखमी झाले आहेत याची माहिती अद्यापि अस्पष्ट असून पोलीस याचा पंचनामा करीत आहेत.
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये सुदर्शन केमिकल कंपनीमध्ये झालेल्या क्लोरीन वायूच्या गळतीमुळे आजूबाजूच्या नागरी वस्ती त मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली आहे महाड औद्योगिक वसाहतीमधील असलेल्या कंपन्यांपैकी कोणत्यातरी कंपन्यांमध्ये तर पंधरा दिवसांनी किंवा आठ दिवसांनी अशी एखादी वायुगळतीची घटना घडत असताना देखील औद्योगिक सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र या निमित्ताने पाहण्यास मिळत आहे केमिकल कंपन्यांमधील कामगारांच्या हिताचे धोरण या निमित्ताने वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट होत आहे फॅक्टरी इंस्पेक्टर हे फक्त नावाला औद्योगिक सुरक्षा बाबतीत भेटी देतात मात्र वायू गळतीच्या घटना या केमिकल कंपन्यांमध्ये वारंवार होत असताना त्यावर मात्र कोणतीच उपाय योजना आखात नसल्याने वाळू गळतीच्या घटना या वारंवार घडणार असे अनेक कामगारांकडून बोलले जात आहे