महाडच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीतील राड्याप्रकरणी तीन आरोपीं अटक…
मुंबई विमानतळावरून पळून जात असताना तब्बल २५ दिवसांनी फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात….
मुंबई( विशेष प्रतिनिधी) महाड नगरपरिषदेच्या २ डिसेंबर रोजी मतदानावेळी राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र व शिवसेना शिंदे गटाच्या कमिटीचे सदस्य तथा कोकण विभाग सचिव विकास गोगावले व व राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत जाबरे या दोन पदाधिकाऱ्यांच्या गटांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी दोन्ही गटातील आरोपी अद्याप फरार आहेत मात्र या प्रकरणात जाबरे गटातील दोन आरोपी पोलीस कष्टडीत आहेत तर शिंदे गटातील तीन आरोपींना आज मुंबई विमानतळावरून पळून जात असताना पोलिसांकडून अटक करण्यात आली त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे
. महाड मधील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी म्हणजे २ डिसेंबर रोजी झालेल्या र*** प्रकरणानंतर दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले व माजी आमदार स्वर्गीय माणिक जगताप यांचे बंधू हनुमंत जगताप यांच्यासह अन्य १०ते १५ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हनुमंत जगताप गटातील दोन आरोपींना अटक केले मात्र विकास गोगावले यांच्या गटातील एकही आरोपी अटक न झाल्यामुळे विरोधकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. . शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील याबाबत गृह खात्यावर ताशेरे ओढले होते तसेच शिरगाव गावचे सरपंच व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी या राड्याप्रकरणी दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन प्रमुख आरोपी विकास गोगावले याची अचूक माहिती देणाऱ्यास पहिल्यांदा 51 हजार तर दुसऱ्यांदा एक लाखाचे बक्षीस जाहीर केलं होते. महाडच्या मारहाणीचा विषय लोकसभा तसेच विधानसभेत देखील गाजला होता. सर्व फरार आरोपींना शोधण्यासाठी महाड शहर पोलीस व रायगड जिल्ह्याच्या गुन्हा अन्वेषण शाखेची टीम ठिकठिकाणी तैनात करण्यात आली. २ डिसेंबर रोजी झालेल्या मारहाणी नंतर विकास गोगावले यांच्या गटातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
शिवसेना शिंदे गटातील राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे महाड मधील राड्या प्रकरणात सहभाग असलेले सहकारी आरोपी मुंबई विमानतळावरून पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली तर एका आरोपीला बिरवाडी येथून ताब्यात घेतले. प्रतीक उर्फ विकी शिंदे, प्रतीक पवार, अमित कदम अशी आरोपींची नावे असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.
महाडच्या २ डिसेंबर रोजीच्या राड्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार असून आरोपी पोलिसांना कधी सापडणार असा सवाल आता उपस्थित. होत आहे
महाड मधील शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील र*** प्रकरणाचा मुद्दा आता लवकरच जाहीर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील महानगरपालिकेच्या निवडणुकीत गाजल परंतु त्याचे खरे पडसाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमटणार असल्याची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात ऐकण्यास मिळत आहे
महानगर परिषदेच्या २ डिसेंबरच्या निवडणुकीच्या काळात. झालेल्या राड्या प्रकरणात आरोपी पोलिसांना सापडू शकत नाही हे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे अपयश की महाड शहर पोलिसांचे की महाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांचे अपयश असा प्रश्न गृहखात्यातीलच पोलिसांना पडला असून याबाबत संपूर्ण जिल्ह्यातील पोलिसांमध्ये देखील उलट सुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहे