विन्हेरे शंकर मंदिरातील दानपेटी फोडून चोरटे फरार! 

महाड( प्रतिनिधी) महाड तालुक्यातील विन्हेरे गावातील ऐतिहासिक स्वयंभू शंकर मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील रोकड लंपास करून चोरट्यांनी पलायन केले आहे

महाड तालुक्यातील विन्हेरे गावातील ऐतिहासिक स्वयंभू शंकर मंदिर हे पुरातन ऐतिहासिक असे शंकर मंदिर आहे या मंदिरामध्ये असणारी स्टीलची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडून त्यातील अंदाजे दहा हजाराच्या आसपास असणारी रोकड लंपास करून चोरटे फरार झाले आहेत

दुसऱ्यांदा दानपेटी फोडण्याची घटना!

विन्हेरे गावातील ऐतिहासिक स्वयंभू शंकर मंदिरा मधील दानपेटी फोडण्याची ही दुसरी घटना आहे यापूर्वी देखील चार महिन्यापूर्वी याच मंदिरातील दानपेटी फोडण्यात आली होती त्यानंतर २६ डिसेंबर रोजी झालेली ही दुसरी घटना आहे या घटनेमुळे खळबळ .उडाली आहे सकाळी ८ चा सुमारास मंदिराचे पुजारी नारायण जंगम हे पूजेसाठी मंदिरात गेले असता त्यांना हा प्रकार घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *