ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बंधाऱ्या लगतची जमीन बंधारा फुटल्याने गेली वाहून! शेतकऱ्याला फटका !! अधिकाऱ्यांचे मात्र ठेकेदाराकडे बोट

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे. बंधाऱ्या लगतची जमीन बंधारा फुटल्याने गेली वाहून! शेतकऱ्याला फटका !! अधिकाऱ्यांचे मात्र ठेकेदाराकडे बोट

 

महाड( प्रतिनिधी)  महाड तालुक्यातील तेटघर येथील . पाणी आडवा पाणी जिरवा या उद्देशाखाली बांधलेला सिमेंट काँक्रीट चा बंधारा पहिल्याच पावसाने जोर धरताच बंधाऱ्यालगतची शेतजमीन धुपून गेल्याची गंभीर घटना समोर आली असून बंधाऱ्याच्या कामात ठेकेदाराने केलेल्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. मात्र जलसंधारण विभागाचे उपा अभियंता मंगेश साठे यांना याबाबत विचारण्यात आले असता करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाईल असे सांगितले मात्र काम करण्यापूर्वी हलगर्जीपणा झाला नसता तर. ही घटना घडली नसती असे शेतकऱ्यांनी सांगितले आता कारवाई कोणी कोणावर करायची असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे

 

कोरडवाहू शेतकऱ्यांना उन्हाळ्यात देखील नगदी पिके घेता यावी यासाठी जलसंधारण विभागामार्फत तेट घर येथे बंधारा बांधण्यात आला पाणी अडवण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेला बंधारा पहिल्याच पावसात अपयशी ठरल्याने प्रशासनाच्या कामकाजावरही या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, बंधाऱ्याच्या बाजूने आवश्यक ती संरक्षक भिंत, दगडी पॅकिंग व माती धूप रोखण्यासाठीची उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. काम पूर्ण झाल्यानंतरही योग्य तपासणी न करता घाईघाईत बिले अदा करण्याचे काम करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

पावसाचे पाणी वेगाने वाहू लागल्याने बंधाऱ्यालगतची माती सरकली आणि काही क्षणातच शेतातील सुपीक जमीन वाहून गेली.

या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे पिकांचे नुकसान झाले असून पुढील हंगामातील शेतीही धोक्यात आली आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यावर आता नव्या संकटाचे सावट आले आहे. “बंधारा आमच्यासाठी वरदान ठरेल, अशी अपेक्षा होती; मात्र पहिल्याच पावसात. बंधारात वरदान ठरण्याऐवजी शाप ठरला,” अशी व्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्याने व्यक्त केली.

, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची असून, अशा निकृष्ट कामांमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

याबाबत जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता मंगेश साठे यांच्याकडे विचारणा केली असता ही जबाबदारी ठेकेदाराची आहे असे सांगून त्यांनी हात झटकले . ठेकेदार संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल तसेच शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती द्वारे नुकसान भरपाईसाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा असा उलट सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला मात्र प्रश्न असा आहे की नैसर्गिक आपत्तीची मदत ही पावसाळ्यातच ठराविक प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतर दिली जाते आता तर पावसाळा जाऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला मग आता नैसर्गिक आपत्ती मदत कशी प्राप्त होईल याचा विसर मात्र साठे यांना पडला जर एका पावसाळ्यातच बंधाऱ्यातून पाणी लिकेज झाले आहे व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर बंधारा बांधताना जलसंधारण विभागाचे अधिकारी व शाखा अभियंता हे काय झोपेत होते का? असा सवाल देखील शेतकऱ्यांनी विचारला आहे. आता जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांकडून आता जलसंधारण विभागाच्या सचिवांकडे करण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *