सावित्री नदीपात्रा जवळील केभुर्ली येथील एम SAND. प्रकल्प अनधिकृतच महाड तहसील कार्यालयाचे स्पष्टीकरण!
एम SANDमुळे गावात . धुळीच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांना श्वसनाचे विकार! मग कायदेशीर कारवाई करणार कोण ग्रामस्थांचा सवाल
महाड (प्रतिनिधी) महाडवळील सावित्री नदी पात्राला लागून असणाऱ्या केभुर्ली येथील एम SAND प्रकल्पाला. गावातील नागरिकांनी धुळीच्या प्रदूषणामुळे गावात लहान मुलांसह वृद्ध व्यक्तींना शासनाचे विकार . बनवण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी एम SANDयुनिट. उभारण्यास गावातील ग्रामस्थ आक्रमक होण्याच्या तयारीत असताना महाड तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीच्या अधिकार पत्रातील उत्तरात या प्रकल्पाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही हे स्पष्ट केले आहे मग या अनधिकृत प्रकल्पालावर कारवाई कोणी करायची असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे
राज्य सरकारने वाळूची टंचाई निर्माण झाल्यामुळे राज्यात सर्वत्र एम SAND युनिटला. मान्यता देण्याचा निर्णय घेऊन दगडापासून वाळू बनवण्याचा नवा पर्याय तयार केला आहे
महाड जवळील केभुर्ली ग्रामपंचायत हद्दीमध्ये सावित्री नदी पात्रालगत नव्याने एम SANDयुनिट स्थापन करण्याचा प्रयत्न. चालू केला आहे मात्र यामुळे गावातील शांतता भंग पावत असून याबाबत गावातील नागरिक अब्दुल रहमान अब्दुल हलीम घोले या ८२ वर्षाच्या वृद्ध व्यक्तींनी या प्लांट मुळे गावात मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण होणार असून माझ्यासह गावातील वृद्ध व लहान मुलांना या धुळीमुळे श्वसनाचे विकार व आवाजामुळे बहिरेपणाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने या एम SANDयुनिटला मंजुरी देऊ नये. अशी मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडे २७ ऑक्टोबर रोजी केली. होती तसेच याच गावचे केभुर्ली ग्रामपंचायत सदस्य जाकीर अब्दुल रहेमान घोले यांनी महाड तहसील कार्यालयात याबाबत माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत या कार्यालयाकडून मौजे केभुर्ली तालुका महाड येथे क्रेशर बसवण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही असे स्पष्ट पणे निवासी नायब तहसीलदार महाड यांनी दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे
सावित्री खाडीपात्राजवळ व केबुर्ली ग्रामपंचायतच्या हद्दीत नव्याने उभ्या राहत असलेल्या एम SAND युनिटला या ग्रामपंचायतीने देखील ना हरकत प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला असून संबंधीत युनिट व्यवस्थापनाला याबाबतचे ग्रामपंचायतीने१९/१०/२०२५ रोजी लेखी नोटीस पाठवली मात्र एम SAND युनिट व्यवस्थापनाने सदरची नोटीस स्वीकारण्यास नकार दिला
तहसीलदार कोणती भूमिका घेणार?
तहसीलदार, मंडळ अधिकारी . हे पर्यावरणाच्या व नागरिकांच्या भूमिकेकडे लक्ष देतात की एम SAND युनिट व्यवस्थापनाच्या बाजूने उभे राहतात . हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल
न्यायालयात जाण्याचा इशारा!
महार तहसीलदार कार्यालयाने M SAND युनिट. प्रकल्पाला कायदेशीर परवानगी दिलेली नसताना देखील प्रकल्प व्यवस्थापन युनिट उभारत असल्याने सदरचे काम तात्काळ थांबून कायद्याचे उल्लंघन झाले आहे असे आदेश संबंधितास पारित करावे अन्यथा मला न्यायालयात जावे लागेल असा इशारा या ग्रामपंचायतीचे सदस्य जाकीर घोले यांनी महाड तहसीलदार यांच्याकडे२२. डिसेंबर रोजी दिलेल्या लेखी अर्जात स्पष्ट केले आहे