आंबेडकरी चळवळीतून शिवसेनेच्या शाखेपर्यंत! आकाश चाबुकस्वार यांची समाजकारणातून राजकारणात ठाम वाटचाल

 

 

मुंबई : प्रतिनिधी – रस्त्यावर उतरून समाजासाठी झटणारा कार्यकर्ता आणि राजकारणातही स्पष्ट भूमिका घेणारा चेहरा म्हणून आकाश मंगला राजेंद्र चाबुकस्वार यांचे नाव पुढे येत आहे. गेली पंधरा वर्षे आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेले आकाश चाबुकस्वार आज शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून काम करत असून, समाजकारणातून राजकारणाकडे जाण्याची त्यांची वाटचाल चर्चेत आहे.

मूळचे बारामती (ता. दौंड, जि. पुणे) असलेले आकाश चाबुकस्वार महार (बौद्ध) समाजातील असून, राजकारण आणि समाजकारण हेच त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र आहे.

पाच वर्षांपूर्वी शिवसैनिक म्हणून सक्रिय झालेल्या आकाश चाबुकस्वार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला. ३ डिसेंबर २०२२ पासून ते शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. शाखा पातळीवर संघटन मजबूत करण्यासोबतच त्यांनी तळागाळातील प्रश्नांवर थेट भूमिका घेतली आहे.

राजकीय कामासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांची ठोस उपस्थिती आहे. बौद्ध प्रगती संघ आणि नालंदा विकास मंडळ (नोंदणीकृत) या संघटनांचे ते सक्रीय कार्यकर्ते असून, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेकदा पुढाकार घेतला आहे.

नुसते भाषण नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारा हा तरुण कार्यकर्ता मुंबई महापालिका निवडणूकित मागासवर्गीय साठी राखीव वॉर्ड क्र.२१५ मधून शिवसेना पक्षातून इच्छुक उमेदवार म्हणून आपले राजकीय भविष्य आजमावत असून समाजासाठी काम करणाऱ्या अश्या तरुणाला उमेदवारी मिळाल्यास येथील विभागातील जनतेसाठी तसेच समाजासाठी नक्कीच काही ठोस कार्य त्यांच्याकडून घडेल अशी विभागात चर्चा चालू आहे. वॉर्ड क्र २१५ मधून शिवसेना पक्षाच्या वतीने कोणाला उमेदवारी मिळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

One thought on “आंबेडकरी चळवळीतून शिवसेनेच्या शाखेपर्यंत! आकाश चाबुकस्वार यांची समाजकारणातून राजकारणात ठाम वाटचाल

  1. आकाश चाबुकस्वार यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.असंच तुम्ही समाजकारण करत रहा सहकार्य करत रहा आमचा पाठिंबा आहे तुम्हाला तुमचा विजय निश्चित आहे साहेब.

    जय हिंद जय महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *