महाड नगर परिषदेच्या निवडणुकीतील राड्या प्रकरणी फरार आरोपी मंत्री पुत्र विकास गोगावलेला अटक कधी करणार?

महाड नगर परिषदेच्या निवडणुकीतील राड्या प्रकरणी फरार आरोपी मंत्री पुत्र विकास गोगावलेला अटक कधी करणार? डी वाय एस पी पोलिस खात्याची नोकरी करतात की गोगावल्यांची चाकरी?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाड विधानसभा उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे

महाड(प्रतिनिधी )
२डिसेंबर रोजी. महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले याने महाडच्या इतिहासात कधीही न घडलेली घटना केली या निवडणुकीमध्ये निवडणूक सुरू असताना निवडणूक प्रक्रिया सुरू असताना विकास गोगावले आणि त्याच्या काही . गुंडांनी महाडमध्ये आल्यानंतर जो तो संपूर्ण प्रकार केला तो प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला या प्रकरणात फरार असणाऱ्या मंत्री पुत्र विकास गोगावले याला अटक कधी करणार असा सवाल करून महाडचे डी वाय एस पी पी शंकर काळे हे पोलीस खात्याचे नोकरी करतात की गोगावल्यांची चाकरी असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाडचे उपजिल्हा समन्वयक व शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथागृहमंत्री यांना केला आहे

 

. महाड ही ऐतिहासिक भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या . पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीमध्ये जे आपण बघितलं ते महाराष्ट्राने बघितलं आता ही एवढी मोठी घटना घडल्यानंतर आज साधारण १३ दिवस होऊन गेले एखादा. मृत पावला असतं तर आज त्याचे कार्य असते आणि इतकी गंभीर घटना घडलेली असताना सुद्धा रायगडच्या एसपी आंचल दलाल यांच्यावर आमचे इतका विश्वास होता की खरंच काहीतरी या एसपी आल्यानंतर आम्हाला वाटतं काहीतरी घडेल आणि कायदा आणि सुव्यवस्था महाडमध्ये राखली जाईल पण तो विश्वास आता आमचा उडालेला आहे कारण आज घटना घडवून एवढे दिवस झाल्यानंतर एकही आरोपी आज पर्यंत यांनी अटक केलेला नाही ज्याच्या वरती गंभीर गुन्हे आहेत ज्या विकास गोगावले वरती आज तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्यावर केलेला हल्ला माझ्यावरती केलेला हल्ला काही दिवसापूर्वी महाड मनसेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर केलेला हल्ला एमआयडीसीमध्ये घडलेल्या घटना मुंबईमध्ये एका उद्योगपतीला अडवून त्याच्या गाड्या फोडलेल्या घटना अशा अनेक तक्रारी आहेत आणि त्याच्यावरती आत्तापर्यंत माझ्या माहितीने माझा माझ्यावरती हल्ला केला जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला तो ३०७ आणि . शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल नवघणे यांच्या वरती हल्ला केला तो ३०७ त्यानंतर आता हा . परवा दिवशी घडला तो ३०७ एमआयडीसी मध्ये सुरू असलेला३०७. असे चार गंभीर गुन्हे दाखल असताना सुद्धा पोलीस विकास गोगावलेला अटक करत नाहीत

त्याला काय कारण असावं बरं तो . फरार झाला असे पोलीस म्हणत असतील तर मग त्या विकास गोगावलेला पोलीस संरक्षण होतं पोलीस संरक्षण असताना विकास गोगावले फरार कसा झाला याचे उत्तर रायगडचे एस पी आंचल दलाल यांनी आम्हाला आम्हाला दिले पाहिजे

मंत्री पुत्र विकास गोगावलेला पोलीस संरक्षण असताना असताना तो फरार कसा होऊ शकतो मग तो फरार होण्यासाठी पोलिसांनी त्याला मदत केली का तो मंत्राचा मुलगा आहे म्हणून त्याला नियम वेगळे त्याला कायदे वेगळे असे काय आहेत का मग विकास गोगावले फरार झाला असे तुम्ही म्हणताय मग तुमचा जो त्या ठिकाणी सुरक्षेसाठी नेमलेला पोलीस गार्ड होता कुठे आहे ?त्या . गार्डची चौकशी करा त्या त्या गार्डला आता विकास गोगावले आता कुठे आहे हे जर माहिती नसेल त्याला तर त्याच्याकडून माहिती घ्या माहिती देत नसेल तर त्याला पहिले अटक करा त्याच्याकडून माहिती घ्या असा सवाल सोमनाथ ओझर्डे यांनी राज्य सरकारला केला आहे
विधिमंडळाचे अधिवेशन नागपूर मध्ये असताना अधिवेशनामध्ये विकास गोगावले फिरतोय हे पोलिसांना दिसत नाही का ?आज पण काल पण विकास अधिवेशनामध्ये नागपूरच्या होता एवढ्या सगळ्या गोष्टी लोकांना समजत नाही पोलिसांना समजत नाही आणि मग आम्ही या गोष्टी पोलिसांना शिकवायच्या का आणि एखादा सर्वसामान्य माणूस असेल त्याच्यावरती तुम्ही लगेच गुन्हे दाखल करता मला सांगा पंकज . उमासरेवर हल्ला झाला त्या प्रकरणात हल्लेखोरांवर ३०७ चा पुन्हा दाखल केला नाही या परंतु घटनेचा गांभीर्य लक्षात घेतलं आणि लगेच दोघांमध्ये परस्पर तिकडून दाखल केले म्हणजे इथे संशय घेण्याची भूमिका पोलिसांवर येते असं विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये पोलिसांबाबत जयंत पाटील बोलले खरं आहे

प्रिव्ही कंपनीकडून आरोपींना फुकट पगार?
महाड मधील नगर परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या गुन्हा प्रकरणी फरार असलेल्या
त्यांच्यामध्ये एक धनंजय मालुसरे आहे तो पूर्वी कंपनीमध्ये फुकटचा पगार घेतो तो कामावर नाही तरी त्याला प्रिव्ही कंपनी पगार देते त्याचा दुसरा भाऊ आहे त्याचं नाव आहे वैभव मालुसरे आता कंपनीतनं एक दिवस दोन दिवस एकदा माणूस गायब झाला तरी त्या कंपनी माणसाचा पगार कसा देते आणि प्रिव्ही कंपनीमधून फुकटचा पगार घेणारी त्यामध्ये हे दोन आरोपी आहेत असे अनेक विषय आहेत की त्यामध्ये ही घटना आपल्याला दिसून येते की पोलिस यांना कुठेतरी संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात

डीवायएसपींना हटवल्याशिवाय निवडणुका सुरळीत पार पडणार नाहीत?
. महाडचे डी वाय एस पी शंकर काळे असतील तर. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक कुठल्याही पद्धतीने पारदर्शक होणार नाही डीवायएसपी शंकर काळे यांची या पदावरून हकालपट्टी झाली पाहिजे त्यांना सस्पेंड करा काय पण करा त्यांना शक्तीच्या रजेवर पाठवा आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये डीवायएसपी शंकर काळे महाडमध्ये नकोय कारण डीवायएसपी शंकर काळे हे पोलीस खात्याची नोकरी करतात की मंत्री गोगावल्यांची चाकरी करतात असा सवाल सोमनाथ ओझर्डे यांनी राज्य सरकारला विचारला आहे
पहिल्यांदाच महाडला असा डीवायएसपी भेटला आहे आहे की तो नोकरी पोलीस खात्याची करतो की भरत गोगावले विकास गोगावलेची करतो ?
कुठल्याही परिस्थितीमध्ये. डीवायएसपी शंकर काळे यांची बदली झालेली पाहिजे आणि आम्हाला यापुढे त्यांच्यामध्ये कुठला विश्वास राहिला नाही

मंत्री पुत्र विकास गोगावलेला माणगाव न्यायालयात अटकपूर्व जामीन त्यांनी उज्वल निकम यांचा मुलगा अनिकेत निकम यांना आणले कोर्टाने त्यांना कुठल्याही प्रकारचं मला वाटतं एक दोन दिवसात तारीख आहे त्या तारखेला कुठल्याही परिस्थितीत कोर्टाने या ठिकाणी जामीन देऊ नये म्हणून आम्ही आमचे वकील सुद्धा लावले सरकार पोलिसांना सांगितले की तपास अधिकारी आहेत खाडे त्यांना सुद्धा आम्ही सांगितले की तपास व्यवस्थित करा विकास गोगावले लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडा त्याला कुठल्याही परिस्थितीत अटक पूर्व जामीन मिळाला नाही पाहिजे आणि जर मिळाला तर आम्ही हायकोर्टात जाऊन त्याच्यावरती पोलिसांमध्ये सुद्धा हे करू की चुकीच्या पद्धतीने चुकीच्या. महाडमध्ये मध्ये घटना घडतात चुकीच्या पद्धतीने महाडमध्ये वातावरण निर्मिती करतोय दहशत निर्माण करतोय तर विकास असाच गोगावलेला अटकपूर्व जामीन मिळाला तर काय होणार आहे तर आगामी निवडणुकीत कोणालाही ते दमदाटी करून मारहाण करतील फरार असताना फोनवरती बोलतोय आणि सगळ्यांना शुभेच्छा देतोय मग पोलिसांना या गोष्टी दिसत नाहीत का की तू फोनवरून कोणाशी बोलतोय कोणाशी चर्चा करतोय कोणाला शुभेच्छा देतोय ह्या पोलिसांनी तपास कसा करावा या लोकांनी आम्ही सांगायचं काय लोकांना त्यामुळे पोलीस यंत्रणा होती विश्वास उडत चाललाय कायदा सुव्यवस्थेचं राज्य राहिलेला दिसून येत नाहीये आमची पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की महाड मधील मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांना अटक करण्यासाठी तुम्ही कृपया करून जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना आदेश द्या तसेच त्या व्यक्तीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाड मधून नव्हे तर रायगड जिल्ह्यातून हद्दपार करा अशा प्रकारचा प्रस्ताव महाडच्या पोलीस निरीक्षकांनी प्रस्ताव मान्य करून हद्द करावा अशी आमची मागणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *