विरारमध्ये मसाज सेंटरच्या आड देहव्यवसायाचा पर्दाफाश; मॅनेजर अटक, दोन संचालक वाँटेड

विरारमध्ये मसाज सेंटरच्या आड देहव्यवसायाचा पर्दाफाश;

मॅनेजर अटक, दोन संचालक वाँटेड

 

विरार : वसई–विरार परिसरात मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यापार रॅकेटचा मोठा भांडाफोड बोलिंज पोलिस स्टेशन हद्दीत करण्यात आला आहे. ग्लोबल सिटी येथील गॉडेस फॅमिली स्पा सेंटर मध्ये मसाजच्या नावावर देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच क्राइम ब्रांचने अचूक सापळा रचत धडक कारवाई केली.

महिला अत्याचार प्रतिबंधक / विशेष बाल संरक्षण कक्ष मिरा भाईंदर वसई विरार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. टीमने बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला असता, केंद्रात देहव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी एक पीडित मुलीची सुटका करण्यात आली असून स्पा मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. तर दोन स्पा संचालक फरार असून ते वाँटेड आहेत.

 

वसई-विरारमध्ये गॉडेस स्पाच्या तीन शाखा

 

चौकशीत उघड झाले की गॉडेस फॅमिली स्पा सेंटरच्या वसई–विरारमध्ये तीन शाखा असून गेल्या तीन ते चार वर्षांपासून मसाजच्या नावावर अवैध देहव्यवसाय चालवला जात होता. स्पाचे संचालक आणि मॅनेजर मुलींना जबरदस्तीने या गैरकृत्यात ढकलत असल्याचे समोर आले आहे.

प्राथमिक तपासात संकेत मिळत आहेत की हा प्रकार एखाद्या मोठ्या सेक्स रॅकेटशी जोडलेला असू शकतो. चालक, मालक आणि मॅनेजर यांनी मिळून हा धंदा संगनमताने उभारल्याचे समोर येत आहे.

 

आगामी काळात आणखी मोठ्या कारवायांची शक्यता

 

या घटनेनंतर वसई–विरार तसेच मीरा–भाईंदरमधील अनेक स्पा सेंटरवर मोठ्या कारवाईची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

कारवाई करणाऱ्या पथकात…

ही कारवाई MBVV पोलिस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी, DCP संदीप डोईफोडे, ACP मदन बल्लाल यांच्या मार्गदर्शनाखाली सीनियर PI शीतल मुंडे, PSI प्रकाश तुपलोंडे, PSI संदीप शिंदे, ASI राजाराम आसवले, HC किशोर पाटील, चेतन राजपूत, महिला HC निशिगंधा मांजरेकर, शीतल जाधव, PC ललित पाटील, घनश्याम खैरनार आणि क्राइम ब्रांचच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.

 

नागरिकांना पोलिसांची विनंती

परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, जेणेकरून अशा घिनौण्याला आळा घालता येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *