शूटआउट’ पुस्तकाला मराठा मंदिर साहित्य पुरस्कार २०२४ ज्येष्ठ छायाचित्रकार–पत्रकार घनश्याम भडेकर यांना सन्मान; पारितोषिक वितरण १३ डिसेंबरला

 

मुंबई : मराठा मंदिर साहित्य शाखेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या साहित्य पुरस्कार २०२४ मधील ललित साहित्य प्रकारात ज्येष्ठ छायाचित्रकार व पत्रकार घनश्याम भडेकर यांचे ‘शूटआउट’ हे पुस्तक उत्कृष्ट ठरले असून त्यांना यंदाचा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पारितोषिकाचे वितरण नामवंत शास्त्रज्ञ, साहित्यिक व ज्येष्ठ लेखक डॉ. गजानन पुरुषोत्तम फोंडके यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, मराठा मंदिर इमारतीतील जिवाजीराव शिंदे सभागृह, (दुसरा मजला), नायर हॉस्पिटलसमोर, मुंबई सेंट्रल येथे आयोजित करण्यात आला आहे.
पत्रकार घनश्याम भडेकर यांनी मित्रपरिवार व कुटुंबासह उपस्थित राहून समारंभाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.
‘शूटआउट’ या पुस्तकाला यापूर्वीही मुंबई मराठी पत्रकार संघाचा सर्वोत्कृष्ट पुस्तक पुरस्कार प्राप्त झाला असून आता मराठा मंदिर साहित्य पुरस्काराने या पुस्तकाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा जोडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *