प्लेझंट पार्क चौकात फेरीवाल्यांचा वाढता कब्जा; नागरिकांची मोठी गैरसोय

 

प्रमोद देठे – मिरा रोड परिसरातील प्लेझंट पार्क चौकात वाढलेल्या फेरीवाल्यांच्या स्टॉल्समुळे नागरिकांना ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे. मुख्य रस्ता, फूटपाथ आणि सार्वजनिक मार्ग व्यापून बसलेल्या या अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून, पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.


प्रभाग क्रमांक 0६ मधील ही समस्या गेल्या काही दिवसांत अधिकच तीव्र झाली आहे. फेरीवाला पथक आणि अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांच्याकडून वेळोवेळी योग्य कारवाई न होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असतानाही सहाय्यक आयुक्त प्रियांका भोसले यांनी अद्याप ठोस पावले न उचलल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
फेरीवाल्यांच्या वाढत्या अनधिकृत स्टॉल्समुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांचा धोका आणि अस्वच्छतेचे प्रश्न उभे राहिले आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.


आता आयुक्त व प्रशासक राधाबिनोद शर्मा यांच्याकडून या वाढत्या अतिक्रमणावर कठोर कारवाई होणार का, की नागरिकांना याच गोंधळाचा सामना करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *