महाड बस स्थानक ते राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची १ वर्षातच दुरावस्था!
रस्त्याच्या नूतनीकरणासाठी खर्च केलेले २.५० कोटी पाण्यात गेले?
महाड (प्रतिनिधी) महाड बस स्थानक ते राष्ट्रीय महामार्ग दरम्यानच्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी खर्च करण्यात आलेले २.५० कोटी रुपये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पाण्यात गेल्याची चर्चा महाड मधील नागरिकांकडून निवडणुकीच्या काळात चर्चिली जात होती मात्र निवडणुकीच्या काळात नगरपालिका प्रशासन निवडणूक कामात व्यस्त असल्याने व नागरिक देखील निवडणुकीत व्यस्त असल्याने याकडे कोणी लक्ष दिले नाही मात्र आता निवडणूक समाप्त होताच या रस्त्यावर पडण्यात आलेले खड्ड्यांची डागडुजी कधी करणार असा प्रश्न या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून नगरपरिषद प्रशासनाला विचारला जात आहे
महाड नगरपरिषद हद्दीतील महाड बस स्थानक ते राष्ट्रीय महामार्ग दरम्यानचा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत मंजूर निधीतून करण्यात आला होता त्यासाठी तब्बल २,४९,८०,१२५ रुपये खर्च करण्यात आले होते

महाड बस स्थानक ते राष्ट्रीय महामार्ग दरम्यानच्या रस्त्याचे उद्घाटन७/१०/२०२४ रोजी तत्कालीन एसटी महामंडळाचे अध्यक्ष व महाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले होते तर मात्र वर्षभरात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर महाड बस स्टॅन्ड कडून राष्ट्रीय महामार्ग रस्त्याकडे जाताना खड्डे पडले आहे तर राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरून महाड कडे येताना अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे
महाड बस स्थानक ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंतचा रस्ता विकसित करताना दोन्ही बाजूकडे असणारे गटार देखील बांधण्यात आले आहेत मात्र या गटारातील पाण्याचा निचरा होत नसल्याने या गटारामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून डासांची निर्मिती होत आहे त्याकडे देखील नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे तसेच या गटारांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा . पडल्यामुळे गटार पूर्णपणे भरून गेले आहे मात्र ते साफ करण्याचे सौजन्य देखील नगरपरिषद प्रशासन दाखवून नसल्याने या गटारात साठलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांच्या संख्येमुळे डेंगूसदृश्य परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही
३ डिसेंबर नंतर खड्डे . भरण्याचे आश्वासन हवेत विरले?
महाड बस स्थानक ते राष्ट्रीय महामार्ग दरम्यानच्या रस्ता विकसित करणे यासाठी तब्बल २,४९,८०,१२५ रुपये खर्च करण्यात आले होते मात्र वर्षभरात या रस्त्यावर पडलेले खड्डे हे किती निकृष्ट दर्जाचे काम आहे याचे जिवंत उदाहरण पाहण्यास मिळत आहे आता पडलेले खड्डे ३ डिसेंबर नंतर भरण्याचे आश्वासन नगरपालिका प्रशासनाने दिले होते मात्र. आज पर्यंत या रस्त्यावर पडलेले खड्डे करण्याचे नाव नगरपरिषद प्रशासनाकडून ठेकेदार घेत नसल्याने या ठिकाणी अपघात झाल्यानंतर नगरपरिषदेचे डोळे उघडणार का असा सवाल या रस्त्यावरून . ये जा करणाऱ्या प्रवाशांकडून विचारला जात आहे मात्र या रस्त्यावर पडलेले खड्डे भरले जातील परंतु निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या ठेकेदाराबद्दल नगरपरिषद काय कारवाई करणार असा प्रश्न देखील सर्वसामान्यांना पडला आहे