दक्षिण मुंबई विभागात वाढत्या प्रदूषणाविरुद्ध मनसे आक्रमक; अनिल शांताराम नागरे यांची आयुक्तांकडे तात्काळ कारवाईची मागणी

 

मुंबई : ग्रँड रोड, मुंबई सेंट्रल ,ताडदेव, गिरगाव क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अनियंत्रित बांधकामांमुळे परिसरातील हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर गेल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबादेवी विधानसभा उपविभागअध्यक्ष अनिल नागरे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

 

तसेच मनपा सी विभाग व मनपा डी विभाग सहाय्यक आयुक्त यांची प्रशांत गांधी (विभाग अध्यक्ष) यांच्या समावेश शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन कारवाईची मागणी केली त्यावेळेस यांच्या समवेत सचिन विचारे (विभाग सचिव), रमेश राणे (चिटणीस मनकासे), रुकेश गिरोल्ला (उपविभाग सचिव), राजेंद्र बनसोडे (उपविभाग सचिव) सावळाराम चीपकर (मा. उपविभाग अध्यक्ष) संदीप साळवे (मा. शाखा अध्यक्ष) करण गुप्ता व इतर सहकारी उपस्थित होते

 

“बांधकाम व्यावसायिकांवर त्वरित दंडात्मक कारवाई करून प्रदूषण नियंत्रण उपाय योजना तातडीने अंमलात आणाव्यात, अन्यथा मनसेच्या वतीने कठोर भूमिका घेण्यात येईल,” असा इशारा प्रशांत गांधी (विभाग अध्यक्ष)अनिल नागरे (उपविभाग अध्यक्ष)यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *