महाड (प्रतिनिधी) अनेक स्वराज्य संस्थेच्या महाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत माती चोरांनी महाड तालुक्याच्या ग्रामीण भागात धुमाकूळ माजवला असून रात्रीस खेळ चाले या म्हणीच्या प्रमाणे रातोरात माती उत्खनन करून मातीचे डोंगर फस्त करण्याचा सपाटा लावला असताना कारवाई कोणी कोणावर करायची असा प्रश्न आता उभा राहिला आहे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्यात महाड तालुक्यातील महाड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महसूल यंत्रणा कामात व्यस्त असल्याचा फायदा घेत तालुक्याच्या ग्रामीण भागात नव्याने तयार होत असलेल्या फार्म हाऊस चा भरावासाठी रात्रीच्या सुमारास डोंगर टेकड्या उध्वस्त करण्याचे काम माती व्यावसायिकांनी करण्याचा सपाटा मागील आठ दिवसापासून चालू केला आहे
महसूल खात्यातील तलाठी मंडळ अधिकारी यांच्यासह नायब तहसीलदार ,तहसीलदार. हे सर्व महसूल अधिकारी महाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या कामात व्यस्त होते याचाच फायदा तालुक्यातील विन्हेरे विभाग ,खाडीपट्टा विभाग ,नाते विभाग, वरंध विभाग ,बिरवाडी विभाग. या सर्व विभागात रस्त्याच्या कामासाठी असो अथवा फार्म हाऊस या नव्या कामाच्या भरावासाठी असो मोठ्या प्रमाणावर मागील आठ दिवसापासून मातीच्या टेकड्या उध्वस्त करण्याचा सपाटा रात्रीच्या सुमारास चालला आहे मात्र मंडळ व तलाठी अधिकारी यांना या गोष्टीची सुत्राम कल्पना नाही यामुळे मागील आठ दिवसात मोठ्या प्रमाणावर महसूल खात्याची रॉयल्टी बुडाली असून आता ही बुडालेली रॉयल्टी महसूल अधिकारी कशी वसूल करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाड तालुक्याच्या ग्रामीण भागात ज्याप्रमाणे माती उत्खनन होत आहे त्याचप्रमाणे रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर कृपया पद्धतीने ब्लास्टिंग करून दगड काढण्याचे काम देखील मोठ्या प्रमाणावर चालू आहे मात्र डोळ्यावर काळी पट्टी बांधून तलाठी व मंडळ अधिकारी या दगड चोरांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही

महाड नगर परिषदेच्या निवडणूक प्रभारी म्हणून महाड तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यामुळे पूर्ण वेळ त्यांना नगर परिषदेमध्ये कामात व्यस्त राहावे लागत होते याचाच फायदा माती माफी यांनी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे खिसे ओले करून मोठ्या प्रमाणावर डोंगर टेकड्या उध्वस्त केले आहे आता ही बुडालेली रॉयल्टी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी वसूल करण्याबाबत व उत्खनन केलेल्या मातीच्या टेकड्यांचे व दगड उत्खनन केलेल्या डोंगरांचे मोजमाप करण्याचे आदेश तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात येणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आ