करोडो खर्च… तरी BSUP इमारतींची दयनीय अवस्था!

प्रमोद देठे – गरिबांसाठी उभारलेल्या BSUP योजनेंतर्गत कोट्यवधींचा निधी फुंकूनही उभारलेल्या इमारती आज धोकादायक ठरत आहेत. भिंतींना भेगा, सिमेंट ढासळणे, गळती, जिने मोडकळीस… अशा उघडपणे दिसणाऱ्या दोषांनी रहिवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह लागले आहे.

 

“निधी गेला कुठे? काम केले कुणी? आणि जबाबदार कोण?” असा थेट सवाल संतापलेल्या नागरिकांनी केला आहे. करोडो रुपये खर्च करूनही अशा निकृष्ट दर्जाच्या इमारती उभारणे म्हणजे सत्ताधाऱ्यांची आणि प्रशासनाची उघडीपणे केलेली थट्टा, अशी जोरदार टीका होत आहे.

 

काही इमारतींना तर प्रत्यक्षात धोकादायक घोषित करण्याची वेळ आली असून, कधी काय कोसळेल याचा भरवसा नाही, अशी भीती रहिवाशी व्यक्त करत आहेत.

 

रहिवाशांचा इशारा : कारवाई नाही तर आंदोलन

निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर, त्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

 

सत्य परिचित न्यूजच्या व्हिडिओ रिपोर्टमधून या इमारतींची वस्तुस्थिती समोर आली असून, प्रशासनाला आता उत्तर देणे भाग आहे.

 

कोट्यवधींचा निधी कुठे गेला?

हा लोकांचा सवाल… आणि BSUP प्रकल्प आता प्रश्नचिन्हांच्या केंद्रस्थानी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *