मुंबई, ता. २१ सप्टेंबर २०२५: मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी रांग, वेळ आणि कागदपत्रांची झंझट आता इतिहासजमा होणार आहे. “डिजी प्रवेश” या नव्या ऑनलाइन प्रणालीमुळे मंत्रालयात प्रवेशासाठी पास मिळवणे झाले अत्यंत सोपे व जलद.

नागरिकांना आता त्यांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वाहन परवाना यापैकी कोणतीही एक अधिकृत ओळखपत्र वापरून ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे मंत्रालयासमोर लांबच लांब रांगा लावण्याची गरज राहिलेली नाही.
१)फक्त एका क्लिकवर प्रवेश निश्चित
२)कधीही, कुठूनही ऑनलाईन नोंदणी
३) प्रवेशासाठी किमान कागदपत्रांची गरज
या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून, सरकारी कार्यालयांतील कामकाजात गती, पारदर्शकता आणि शिस्त येणार आहे. ही प्रणाली डिजिटल इंडिया मोहिमेच्या पुढील टप्प्याकडे एक ठोस पाऊल मानली जात आहे.
मंत्रालय भेट देणाऱ्या सर्व नागरिकांना आजच “डिजी प्रवेश” ॲप गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअर वरून डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
