मुंबई, (प्रमोद देठे )– अश्विन/शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ पासून होत असून, श्री मुंबादेवी मंदिरात या पावन उत्सवासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पहाटे ५.३० वाजता मंगल आरतीने मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जाणार आहेत.
सकाळी ७.०० ते ८.०० दरम्यान पारंपरिक विधीने घटस्थापना होणार आहे. संपूर्ण नवरात्र काळात २१ विशेष पुजाऱ्यांद्वारे चंडीपाठ करण्यात येणार आहे.
🔸 पंचमी (दि. २६ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी ६ वाजता दीपोत्सव
🔸 नवमी (दि. १ ऑक्टोबर) रोजी सकाळी १० वाजता महापूजा व चंडी हवन, संध्याकाळी ५.३० वाजता पूर्णाहुती
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाने दोन मोठे मंडप, मोफत चप्पल स्टँड, आणि मोफत पाणपोई व सरबत वाटप यांसारख्या सुविधा पुरवल्या आहेत. बॅग स्कॅनर, वाढवलेली सुरक्षा, आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या माध्यमातून सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट तसेच मुंबादेवी भक्त मंडळ यांच्या वतीने १५० स्वयंसेवक, डॉक्टरांची टीम, औषधांसह ॲम्ब्युलन्सची सुविधा देखील देण्यात येणार आहे.
दिवसभरात ६ वेळा आरती होणार असून, स्थानिक लोकमान्य टिळक पोलीस ठाण्याच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मंदिर प्रशासनाने भाविकांना विनंती केली आहे की, दर्शनासाठी येताना मोठ्या बॅगा घेऊन येऊ नयेत, जेणेकरून सुरक्षा यंत्रणेवर ताण येणार नाही आणि इतर भाविकांनाही अडथळा निर्माण होणार नाही.
हेमंत पु. जाधव
श्री मुंबादेवी मंदिर
मो. 7977319254 / 9820428280 / 9820128280