महाड (मिलिंद माने) महाड तालुक्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरित्या दारूचे अड्ड्यांचा महापूर आला असताना अनधिकृत दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी किती दक्ष आहेत याचे उत्तम उदाहरण महाडच्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयात आज पाहण्यास मिळाले चक्क राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयाला टाळी असल्याने शासकीय टपाल घेऊन येणाऱ्या पोस्टमनला देखील शासकीय टपाल दरवाजा खालून टाकण्याची वेळ आज उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयाबाहेर पाहण्यास मिळाले
महाड तालुका हा ऐतिहासिक वारसा लाभलेला तालुका असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व कोकण रेल्वे या तालुक्यातून मार्गक्रमण होते या तालुक्या त मुंबई पुण्यापासून येणारे पर्यटक हे मोठ्या प्रमाणावर असून महाड तालुक्यात महाड शहरातच दोन वाईन शॉप ची अधिकृत दुकाने आहेत मात्र या वाईन शॉप मधून विनापरवाना दारू गावोगावी विक्रीसाठी घेऊन जाण्याचे काम परवाना नसताना दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर चालू असल्याचे चित्र वाईन शॉप च्या बाहेर पाहण्यास मिळते

महाड शहरात असणाऱ्या दोन वाईन शॉप मधून तालुक्यातील खेडोपाडी अनधिकृत पणे दारूची दुकाने चालवणारे असंख्य महाभाग खेडोपाडी पाहण्यास मिळतात या अनधिकृत दारू विक्री करणाऱ्यांचे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर साम्राज्य पसरले आहे मात्र राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी यांच्याकडे कानाडोळा करून त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने गावोगावी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर मध्याच्या आहारी गेला आहे
महाड शहरातील नवे नगर येथे असणारे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयाला चक्क टाळे असल्याचे पाहण्यास मिळाले. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयाला टाळे असल्याने शासकीय टपाल घेऊन येणाऱ्या पोस्टमन देखील बुचकाळ्यात पडला आपले टपाल आता कोणाकडे द्यायचे असा प्रश्न त्याला पडला असताना त्याने आपले टपाल राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या बंद असणाऱ्या दरवाज्याच्या खालूनच टाकून आपले सोपस्कार पार पाडले मात्र या निमित्ताने प्रश्न असा उपस्थित होतो की शासकीय कार्यालयाला टाळे लावून नक्की राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी नेमके गेले कुणीकडे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कारभारावर लक्ष केंद्रित करण्यास कमी पडत नाहीत ना असा सवाल या बंद कार्यालयाकडे पाहून अनेक जण असा प्रश्न राज्याच्या उत्पादन शुल्क मंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विचारीत आहेत