भाईंदरमधील सुरज प्लाझा इमारतीत शॉर्टसर्किटमुळे लागली आग

 

भाईंदर पश्चिम येथील स्टेशन रोडवरील सुरज प्लाझा बिल्डिंग मध्ये असलेल्या खुशी आर्ट्स फोटो स्टुडिओमध्ये शनिवारी अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मिरा-भाईंदर महानगरपालिका अग्निशमन विभागाला कळविले. अग्निशमन दलाची गाडी त्वरित घटनास्थळी दाखल झाली व तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही टळले. नागरिकांमध्ये मात्र काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाने वेळेवर दाखल होऊन प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली. या घटनेतून पुन्हा एकदा विद्युत सुरक्षेची काळजी घेणे व नियमित तपासणी करणे किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *