मुंबई – महाराष्ट्र सरकारने कोकणातील प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मुंबईला रत्नागिरी (जायगड) व सिंधुदुर्ग (विजयदुर्ग) शी जोडणारी दक्षिण आशियातील सर्वात वेगवान Ro-Ro (Roll-On Roll-Off) फेरी सेवा येत्या १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. या सेवेद्वारे प्रवासी आपल्या कार, दुचाकी किंवा बससह थेट बोटीत चढू शकतात आणि कोकणात पोहोचू शकतात. यामुळे महामार्गावरील वाहतूक टळेल, इंधनाचा खर्च आणि प्रवासाचा वेळ वाचेल.
प्रवास वेळ:
मुंबई – रत्नागिरी (जायगड): ३ ते ४ तास
मुंबई – सिंधुदुर्ग (विजयदुर्ग): ५ ते ६ तास
प्रवासी क्षमतेसह वाहनांची ने-आण करता येणार:
५० कार, ३० दुचाकी, मिनीबस, मोठ्या बस
एकूण प्रवासी क्षमता – ६५६
प्रवासी भाडे:
इकॉनॉमी (552 सीट): रु.2,500
प्रीमियम इकॉनॉमी (44 सीट): रु.4,000
बिझनेस क्लास (48 सीट): रु.7,500
फर्स्ट क्लास (12 सीट): रु.9,000
वाहन भाडे:
कार: रु.6,000
दुचाकी: रु.1,000
सायकल: रु.600
मिनीबस: रु.13,000
30-सीटर बस: रु.14,500
45-सीटर बस: रु.17,000
मोठी बस: रु.21,000
मुंबई-गोवा महामार्गावरील गर्दी आणि रेल्वेची कोंडी टाळण्यासाठी ही सेवा भाविकांसाठी वरदान ठरणार आहे.