मुंबई :
भक्तिभावाने साजरा होणाऱ्या गौरी-गणपती उत्सवाला यंदा एक वेगळा रंग देण्यासाठी हाजी शहानवाज खान फाउंडेशनतर्फे पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) घरगुती गौरी-गणपती आरास व सजावट स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेची कालावधी व क्षेत्र
-
स्पर्धा ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहे.
-
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे.
बक्षिसांची माहिती
या स्पर्धेत –
-
प्रथम, द्वितीय व तृतीय असे मुख्य तीन क्रमांक
-
तसेच उत्तेजनार्थ तीन स्वतंत्र बक्षिसे दिली जातील.
-
याशिवाय प्रत्येक जिल्हानिहाय प्रथम व द्वितीय असे स्वतंत्र बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
सर्व विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहे.
सहभाग कसा घ्यावा?
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी –
-
आपल्या घरगुती गौरी-गणपती आरास व सजावटीचे फोटो किंवा व्हिडिओ Instagram वरील Haji Shahnawaz Khan या अधिकृत आयडीवर टॅग करावेत
किंवा -
व्हॉट्सअॅप क्रमांकावर (9987573552 / 7710086786) फोटो-व्हिडिओ पाठवावेत.
आयोजकांचे आवाहन
“पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि नवी पिढीला इको-फ्रेंडली सजावटीचे महत्त्व पटवून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन हाजी शहानवाज खान फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7710086786 (हाजी शहानवाज खान)