अंमली पदार्थ विक्रेत्याला १५ वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपयांचा दंड

मुंबई (सुधाकर नाडर)- बांद्रा युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मोठे यश मिळाले असून, सराईत ड्रग पेडलर समीर शब्बीर शेख ऊर्फ ‘पाणीपुरी’ याला मा. विशेष सत्र न्यायालय (कोर्ट क्र. ४३, मुंबई) यांनी १५ वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
दि. १२ मे २०२२ रोजी गस्तीदरम्यान समीर शेखकडून ११० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा क्र. ९७/२०२२ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, याआधीही त्याच्यावर एनडीपीएससह चोरी, छेडछाड, मारहाण आणि मकोका अंतर्गत गुन्हे नोंद आहेत. स.पो.नि. श्रीकांत कारकर यांनी या प्रकरणाचा कौशल्यपूर्ण तपास करून वेळेत दोषारोपपत्र दाखल केले.
दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून मा. विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
या कारवाईमध्ये मा. पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उप आयुक्त (अं.प.वि.) नवनाथ ढवळे, सहाय्यक आयुक्त सुधीर हिरडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तत्कालीन प्र.पो.नि. संजय चव्हाण, प्रभारी पो.नि. विशाल चंदनशिवे, स.पो.नि. श्रीकांत कारकर आणि पथकातील इतर पोलिस अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *