मिरा रोड – महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची मोठी साठवणूक उघडकीस आली आहे. MBVV (Mira-Bhayandar Vasai-Virar) मिरा भाईंदर वसई विरार झोन १ चे DCP राहुल चव्हाण (IPS) यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मिरा रोड पूर्व येथील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुन्शी कंपाउंड, कृष्ण स्थळाजवळ गुटख्याच्या गोदामावर कारवाई केली.
या छाप्यात विमल पान मसाला, राजनिवास पान मसाला आणि अन्य प्रकारच्या बंदी असलेल्या गुटख्याचा साठा व एका मारुती ईको वाहनासह सुमारे रु.१०.५० लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी या गोदामाचा मालक आणि माल वाहतूक करणाऱ्या ईको चारचाकी वाहनाच्या मालकाला वॉन्टेड घोषित केले असून, त्यांचा तपास सुरू आहे.
गुटखा महाराष्ट्रात संपूर्णतः बंदी असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई केल्यानंतर पोलिसांनी आता गुटख्याच्या घाऊक विक्रेत्यांचा शोध सुरू केला असून, मिरा रोडमध्ये बंदी असलेला हा माल नेमका कुठून आणला जात होता याचा तपास गतीने सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई DCP राहुल चव्हाण (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून,
काशिमीरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी पथकाने छापा टाकून संपूर्ण माल जप्त केला.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,महाराष्ट्रात बंदी असलेल्या कोणत्याही पदार्थांचा व्यवहार, साठा किंवा विक्री दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे तसेच पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.