वरंध घाटात पडलेली दरड काढून वाहतूक पूर्वपदावर केली तरी गणेशोत्सवात वाहतूक चालू राहील का चाकरमान्यांचा सवाल? 

 

 

महाड (मिलिंद माने) रायगड जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या विशेषता पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या महाड तालुक्यातील वरंधा घाटात माझेरी गावाजवळ सकाळी पडलेली दरड काढून वाहतूक पूर्व पदावर केली असली तरी गणेशोत्सव काळामध्ये या घाटातून वाहतूक चालू राहील का असा अहवाल कोकणात गणेशोत्सव काळात येणारे गणेश भक्त राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला विचारत आहेत.

कोकणातील रायगड जिल्ह्यात त मागील दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती त्यातच आज सकाळी पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाटातील माझेरी गावाजवळ दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने दरड हटवून वाहतूक पूर्ववत. केली आहे

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंध घाटात दरड कोसळली ती स्थानिकांच्या मदतीने दरड काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.. मात्र आठ दिवसावरवून ठेवलेल्या गणेशोत्सव काळात पुणे जिल्ह्यातून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग. जिल्ह्यात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पूर्ववत करेल का असा अहवाल गणेश भक्त विचारीत आहेत मात्र पुणे जिल्ह्यात चालू असणाऱ्या कामामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे गणेशोत्सव काळामध्ये या रस्त्यावरून वाहतूक चालू करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गांभीर्याने घेईल का हा प्रश्न वाहतूकदारांना पडला आहे कारण या मार्गावरून येणाऱ्या मालवाहतूक व भाजीपाला वाहतूकदारांना हा रस्ता बंद असल्याने मोठा फटका सहन करावा लागत आहे मात्र याबाबत महाड येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत३२. रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील दत्तात्रय तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते व तातडीने हा रस्ता चालू करण्यास सांगितले होते मात्र खासदारांच्या सुटणेला केराच्या टोपलीत टाकण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी करतील की खरोखरच हा रस्ता पूर्ववत करून गणेश भक्तांना दिलासा देतील हे येत्या आठवडाभरात समजेल असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ विचारीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *